Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रक्षकच बनले भक्षक! १ कोटींवर डोळा; पुण्यात पोलिसांनीच रचला दरोड्याचा कट, चोरीचा ‘सिनेस्टाइल’ थरार….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 27 July 2026, 14:23

पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलाला हादरवून सोडणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, एका कोटी रुपयांच्या रोख रकमेवर डल्ला मारण्यासाठी पोलिसांसह काही जणांनीच दरोड्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका तोतया पत्रकारासह काही आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी ओळखीतील व्यावसायिक व्यवहारासाठी १ कोटी रुपयांची रोख रक्कम देण्यास सहमती दर्शवली होती. १८ जुलै रोजी त्यांनी दोन बॅगांमध्ये ही रक्कम घेऊन सिंहगड रस्त्यावरील एका ठिकाणी पोहोचत संबंधित व्यक्तींच्या कारमध्ये प्रवेश केला. ही रक्कम नऱ्हे येथील बँकेत जमा करण्याचे नियोजन होते.

मात्र, कार नऱ्हेकडे जात असताना अचानक मार्ग बदलण्यात आला. त्याचवेळी एका दुचाकीवरील दोघांनी कार अडवली आणि स्वतःला पोलीस असल्याचे सांगत गाडी थांबवण्यास भाग पाडले. “तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात,” अशी धमकी देत त्यांनी पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला. विरोध होताच व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली. या गोंधळात एक बॅग सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्या बॅगेसह व्यावसायिक कारमध्येच अडकून राहिले.

 

यानंतर संबंधितांना थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत नेण्यात आले. तेथे एका तोतया पत्रकाराने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत संपूर्ण कारवाई वैध असल्याचा आव आणला. धक्कादायक बाब म्हणजे, त्या वेळी सुट्टीवर असलेली महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्री हेही तेथे उपस्थित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांनीही व्यावसायिकालाच उलट धमकावत बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप करून त्याच्यावर दबाव टाकल्याचे समोर आले आहे. याच काळात पैशांच्या बॅगेतील सुमारे ७ ते ८ लाख रुपये गायब झाल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, संशयास्पद हालचालींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस चौकी गाठली. वरिष्ठ अधिकारी पोहोचताच परिस्थिती बदलली आणि गायब झालेली रक्कम परत करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सखोल चौकशीतून संपूर्ण कट उघडकीस आला. या प्रकरणात एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तोतया पत्रकार आशिष तिवारीसह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम, पोलीस नाईक अजित मेस्री आणि इतर साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून तपास यंत्रणा संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास करत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रक्षकच बनले भक्षक! १ कोटींवर डोळा; पुण्यात पोलिसांनीच रचला दरोड्याचा कट, चोरीचा ‘सिनेस्टाइल’ थरार….

Monday, 27 July 2026, 14:23

महिलेशी वाद घातला, पोलिसालाही धक्काबुक्की केली! पुण्यात डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 14:17

चासकमान कालव्याच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप; अस्तरीकरणाचे काम पाडले बंद

Monday, 27 July 2026, 13:48

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; धडक मोहिमेला कोर्टाचा ब्रेक?

Monday, 27 July 2026, 13:19

क्रिकेट स्पर्धेतील गोळीबार प्रकरणात योगेश मचालेसह टोळीवर मोक्का; शिरूर पोलिसांची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:38

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

Monday, 27 July 2026, 12:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.