Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंचनामा रुग्णसेवेचा…! पुणे शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांकडून औषधांच्या नावाखाली रुग्णांची मोठी लूट…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 March 2026, 16:19

लोणी काळभोर, ता. 17 :“स्वस्त औषधे बाहेर, महागड्यांची सक्ती आत!” या धक्कादायक वास्तवामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णसेवेचा काळा चेहरा समोर येत आहे. राज्यात अनेक औषधांवर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असताना, अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना “आमच्याच मेडिकलमधून औषधे घ्या” अशी सक्ती केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

रुग्णालयातील अति दक्षता विभागात (ICU) रुग्ण उपचार घेत असताना नातेवाईकांची अक्षरशः आर्थिक कोंडी होते. किती औषधे वापरली, किती परत झाली याचा कोणताही स्पष्ट हिशोब दिला जात नाही. मात्र हातात दिली जाते ती मोठमोठी औषधांची यादी, ज्यामुळे नातेवाईक पूर्णपणे संभ्रमात पडतात.

जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांनी “ओळखीच्या मेडिकलमधून स्वस्त औषधे आणू का?” असा प्रश्न विचारला, तर “ती औषधे चालणार नाहीत” असे सांगून त्यांना थेट नकार दिला जातो. विशेष म्हणजे, तीच कंपनी आणि तीच औषधे बाहेर उपलब्ध असतानाही रुग्णालय प्रशासन ती स्वीकारण्यास तयार नसते.

जिल्ह्यातील अनेक मेडिकलमध्ये मानक (ब्रँडेड) औषधांवर 10 ते 15 टक्के, तर जनरिक (निर्ब्रँड) औषधांवर तब्बल 30 ते 50 टक्के सवलत मिळत असताना, रुग्णालयांकडून मात्र महागडी औषधे घेण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे “COT” किंवा कमिशनच्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

 

दरम्यान, रुग्णालयात उपचारासाठी येणारे नागरिक बरे होण्यासाठी येतात की आर्थिक लूट सहन करण्यासाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून, या प्रकारामुळे जनमानसात तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रुग्णालयांचा उघड लुटमार कारभार!

पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांकडून सर्वसामान्य रुग्णांची सरळसरळ आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. उपचाराच्या नावाखाली अवाजवी बिल, औषधांवर अतिरिक्त दर आणि रुग्णांच्या असहायतेचा गैरफायदा घेणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

कारवाई कधी होणार?

अनेक तक्रारी समोर येऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “प्रशासन नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणा मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत असून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुणे प्राईम न्यूजचे आवाहन

रुग्णांनी तुमच्यावर झालेला अन्याय निःसंकोचपणे मांडावा किंवा व्हिडिओ स्वरूपात पाठवावा. पुणे प्राईम न्यूज तुमचा आवाज बुलंद करेल! संबंधित दवाखान्याचे नाव जाहीर करून प्रकरण प्रकाशझोतात आणले जाईल आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. नाव जाहीर करायचे नसेल, तरीही तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. पण अन्याय सहन करू नका, असे आवाहन ‘दैनिक पुणे प्राईम न्यूज’ टीमच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Thursday, 1 October 2026, 15:04

पुण्यात बसथांब्याजवळ २ जणांचा वावर, संशयित हालचाली; पोलिसांनी तात्काळ झडती घेतली अन् झाला ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

Thursday, 1 October 2026, 14:53

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44
Next Post

बँकांनो, ३१ मार्चपर्यंत कर्ज वितरणाचे टार्गेट पूर्ण करा! अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांचे बँकर कमिटीला कडक निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp