Navale Bridge Accident : शहरातील नवले पूलावर भीषण अपघात होऊन मोठी जीवितहानी झाल्यानंतर महामार्गावरील सुरक्षिततेसंदर्भात पालिका प्रशासनाने तत्काळ बैठक घेत उपाययोजनांची घोषणा केली आहे. आता मुंबई–बंगळुरू मार्गावरील या धोकादायक उतारावर गाड्यांची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वेग मर्यादा ण पाळल्यास कारवाई केली जाणार आहे. (Navale Bridge Accident latest news)

नवे नियम ?
मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलावरील दुर्घटनेनंतर वाहनांची वेगमर्यादा 60 किलोमीटर प्रतितासावरून थेट 30 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. काल १५ नोव्हेंबर शनिवारी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मध्यामांशी बोलताना रस्ते सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. असे म्हटले.
हेही वाचा: मसाज रूममध्ये चालायचं काय? पुणे पोलिसांनी छापा टाकला अन् समोर आलं धक्कादायक सत्य
याचदरम्यान, खेड-शिवापूर टोलनाक्यावर अवजड मालवाहतूक गाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावरच अतिरिक्त माल उतरविण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालवाहू वाहनांची तांत्रिक तपासणी आणि ब्रेकची चाचणी केली जाणार आहे.
मात्र, या उपाययोजना केल्याने टोलनाक्यावर गर्दी होऊ शकते. तसेच कमी वेग केल्यानेही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते.







