पुणे: खराडी (Pune News) परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात ‘पिटा’ कायद्यान्वये कारवाई सुरू आहे.

पुण्यातील खराडी येथील तुळजाभवानी नगरमधील ‘द स्पेस बिल्डिंग’मध्ये असणाऱ्या ‘व्हाईट लोटस स्पा’ या मसाज सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे आणि त्यांच्या विशेष पथकाने गैर कृत्याची माहिती मिळाल्यानंतर अचानक छापा टाकून या छुप्या मार्गाने सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. मिळालेल्या माहितीनुसार, स्पा मालक तरुन्नम मनसुर खान (वय 33, रा. साई सहवास सोसायटी, वाडे बोल्हाई, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुन्नम खान हा ‘व्हाईट लोटस स्पा’मध्ये महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करत होता. या मसाज सेंटरच्या नावाखाली तो महिलांकडून गैर कृत्य करण्यास भाग पाडत होता.

दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी 3 महिलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास आणि चौकशी पोलीस निरीक्षक आशालता खापरे करत आहेत.







