Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 19:34

आदित्य बोराटे

इंदापूर: उजनी जलाशयातील मासेमारीसाठी प्रस्तावित ई-टेंडर अर्थात ठेका पद्धतीला तसेच प्रस्तावित तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवित शेकडो स्थानिक मच्छीमारांनी पळसदेव परिसरात भीमा नदीपात्रात उतरून आंदोलन केले. ‘उजनीचा मासेमारी ठेका रद्द करून पूर्वीप्रमाणे मासिक पास पद्धत सुरू ठेवावी,’ अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

उजनी जलाशयातील मासेमारीवर परिसरातील अनेक मच्छीमार कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. अनेक वर्षांपासून मासिक पास पद्धतीने मासेमारी केली जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मात्र, मासेमारीसाठी ई-टेंडर काढून ठेका पद्धत लागू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक रोजगारावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

ठेका पद्धतीला विरोध

मासेमारीचा ठेका बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेला मिळाल्यास स्थानिक मच्छीमारांचा रोजगार प्रभावित होऊ शकतो, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. त्यामुळे ई-टेंडर प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे मासिक पास पद्धत कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मच्छीमारांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

सौरप्रकल्पाच्या परिणामाबाबतही चिंता

उजनी जलाशयावर प्रस्तावित तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाबाबतही मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे मासेमारीच्या व्यवसायावर संभाव्य परिणाम होण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. जलाशयावर अवलंबून असलेल्या स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा विचार करूनच प्रकल्प व मासेमारीसंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

पोलिसांचा बंदोबस्त

आंदोलनादरम्यान महिला, पुरुष व युवकांसह मोठ्या संख्येने मच्छीमार नदीपात्रात उतरले. पोलिसांनी आंदोलकांना पाण्याबाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मच्छीमारांनी घेतली. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

१५ सप्टेंबरपूर्वी शासनस्तरीय बैठक

दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचेता डुंबरे यांनी आंदोलनस्थळी मध्यस्थी करत मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मच्छीमारांच्या निवेदनातील मागण्यांची नोंद घेण्यात आली असून, त्या वरिष्ठ स्तरावर सादर करून शासनस्तरावर प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले. याबाबत १५ सप्टेंबरपूर्वी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा विचार न करता ई-टेंडर प्रक्रिया किंवा सौरऊर्जा प्रकल्पाबाबत निर्णय घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मच्छीमार संघटनेने दिला.

राजकीय, सामाजिक संघटनांचा सहभाग

या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04
Next Post

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp