Monday, August 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खंडणी, धमकी अन् वारंवार बलात्काराचा थरार… तिने नकार देताच डोकं सटकलं अन् गार्डनमध्येच केला अत्याचार; पुण्यातील बिल्डरपुत्राचा कारनामा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 24 August 2026, 14:36

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाचा मुलगा ईशान कक्कर याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळल्याच्या गंभीर आरोपांखाली दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिल्लीतील भारतनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित तरुणी सध्या २५ वर्षांची असून पुण्यातील एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. तिच्या कुटुंबाचे २०१३ मध्ये पुण्यात स्थलांतर झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ती काही काळ दिल्लीतील नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी तिची ईशान कक्कर याच्याशी ओळख झाली.

तक्रारीनुसार, मे २०१४ मध्ये ईशान दिल्लीतील नातेवाईकांच्या घरी गेला होता. त्याने पीडितेला गाडीने बाहेर फिरायला जाण्यास सांगितले. त्यानंतर तिला अशोक विहार परिसरातील बाबा खिम्मन सिंह पार्क येथे नेण्यात आले. तेथे ईशानने प्रेमसंबंधाचा प्रस्ताव दिला. पीडितेने नकार दिल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यावेळी भीती आणि लज्जेमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. त्या वेळी पीडिता १३ ते १४ वर्षांची होती.

तक्रारीनुसार, या घटनेला अनेक वर्षे उलटल्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये ईशानने पुन्हा पीडितेशी संपर्क साधला. त्यावेळी ती गाझियाबाद येथे नातेवाईकांकडे होती. ईशानने फोन करून संपर्कात राहण्यास सांगितले आणि भेटण्यासाठी दिल्लीला येण्यास सांगितले. काही कारण सांगून त्याने ५० हजार रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

 

त्यानुसार पैशांची व्यवस्था केल्यानंतर ईशानने तिला वझीरपूर परिसरात बोलावले. पीडिता कन्हैयानगर मेट्रो स्थानकावर पोहोचल्यानंतर ईशान कार घेऊन तेथे आला. त्याने तिला कारमध्ये बसवून पुढे नेले आणि पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने या प्रकाराला विरोध करत आरोपीला जाब विचारल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

२०१४ आणि २०२२ या दोन्ही घटनांबाबत पीडितेने अखेर ५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास भारतनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक बिंदू करत आहेत.

पीडितेच्या आईने आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा मुलीच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला असून संपूर्ण कुटुंबाला मानसिक धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकरी कर्जमाफीचा दुसरा टप्पा पूर्ण! ६ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५,०८६ कोटी रुपयांचा निधी वर्ग

Monday, 24 August 2026, 21:49

पती-पत्नीचा वाद गोळीबारावर! ‘गोळी’ कोणी झाडली? गूढ कायम; पुण्यातील कसबा पेठेत घडली दुर्घटना

Monday, 24 August 2026, 21:18

‘तिनं माझ्या भावाला घराबाहेर काढलं, आमच्याशी संबंध तोडले’ कुणाल चांदगुडेच्या आत्याचा खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

Monday, 24 August 2026, 20:54

दहशत माजवणाऱ्या सुरज देडगेची एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Monday, 24 August 2026, 20:23

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय; क्रीडा धोरणातील बदलांसह नागपूर-अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक घोषणा

Monday, 24 August 2026, 19:50

अंतरवालीत पुन्हा पेटणार आंदोलनाचा वणवा! मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा; 29 ऑगस्टला आंदोलनाचा एल्गार

Monday, 24 August 2026, 18:59
Next Post

समोर हजारोंची गर्दी अन् तरुणीने स्टेजवर राहुल गांधींना केलं किस; पुण्यातील व्हिडिओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp