Friday, July 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी तुकाराम मुंढेंचा खास माणूस’ नावाचा गैरवापर करणं पडलं महागात! शासकीय कामांचं आमिष अन् लोकांची फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 July 2026, 15:01

पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगून शासकीय कामे करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या एका डॉक्टरविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्तांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने अधिकृत तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव डॉ. हिमांशू अजवाणी (वय ४८, रा. पुणे) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अजवाणी यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पाठवून स्वतःचा उल्लेख “अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा डॉक्टर” असा केला होता. तसेच आयुक्तांशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचा दावा करत त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून कोणतीही शासकीय कामे करून देऊ शकतो, असेही त्यांनी या संदेशात म्हटल्याचा आरोप आहे.

सदर संदेश सोशल मीडियासह विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांच्या मते, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा अशा प्रकारे वापर केल्यामुळे विभागाची प्रतिमा आणि प्रशासनावरील विश्वास प्रभावित होण्याची शक्यता होती.

 

यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने पुणे पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात डॉ. हिमांशू अजवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, संबंधित संदेशाचा उद्देश काय होता, त्याद्वारे कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला होता का आणि अशा प्रकारचे संदेश अन्य ठिकाणीही पाठविण्यात आले होते का, याचा तपास केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मी तुकाराम मुंढेंचा खास माणूस’ नावाचा गैरवापर करणं पडलं महागात! शासकीय कामांचं आमिष अन् लोकांची फसवणूक

Friday, 17 July 2026, 15:01

गांजा भरलेल्या चिलीमचा झुरका पडला महागात! कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, एमआयटी कॉर्नर आणि लोणी कॉर्नर परिसरात 7 जणांना घेतले ताब्यात

Friday, 17 July 2026, 14:42

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांचा दणका; एकाच दिवशी तीन चालकांवर गुन्हे

Friday, 17 July 2026, 14:35

पेठ येथे रस्त्यावर स्वयंपाकाचे पाणी टाकल्यावरून वाद; उरुळी कांचन पोलिसांत परस्परविरोधी तक्रार

Friday, 17 July 2026, 14:32

“‘मला माफ करा मित्रांनो…’ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनंतर शिक्षकाच टोकाच पाऊल ; दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवल्याने नांदेडमध्ये खळबळ

Friday, 17 July 2026, 14:13

भारतात अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटांचा कट; जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेले 5 संशयित ATSच्या ताब्यात

Friday, 17 July 2026, 14:08
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.