Monday, June 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादीत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान! जय पवार आणि वळसे पाटलांनी सोडलं मौन म्हणाले ‘कार्यकर्त्यांची नाराजी आम्ही….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 18:08

पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेल्या चर्चांना आता वेग आला आहे. पक्षाकडून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच भाजपचे प्रदीप कंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोरही नवे आव्हान उभे राहिले आहे.

महायुतीच्या जागावाटपात पुणे विधानपरिषद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आला आहे. त्यानुसार माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर सुनील टिंगरे यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर टिंगरे अर्ज मागे घेतील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्यासाठी तुषार कामटे यांनी डमी अर्ज भरला आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना जय पवार यांनी वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य असल्याचे सांगितले. पक्षातील कोणत्याही नाराज नेत्यांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी पक्षाची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट करत विक्रम काकडे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचे त्यांनी म्हटले.

भाजप नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही महायुती एकत्र असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता 4 जूननंतर अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अनधिकृत ढाबे, पार्किंग हटवून रस्ते मोकळे होणार; अपघात रोखण्यासाठी मोहीम, रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय‎

Monday, 1 June 2026, 21:03

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा? तब्बल 1.25 कोटी महिलांना डच्चू; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर घणाघात

Monday, 1 June 2026, 20:59

शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार! करडे घाटात सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या; टोळीयुद्धात एकाचा बळी

Monday, 1 June 2026, 20:28

“मी इथला भाई आहे!” म्हणत समाजसेविकेचा भररस्त्यात विनयभंग; कोंढव्यात अश्लिल शेरेबाजीचा धक्कादायक प्रकार

Monday, 1 June 2026, 19:44

लोणी काळभोर येथील १६ वर्षाच्या मुलीचा बालविवाह, मुलीच्या आईसह पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 1 June 2026, 19:15

खून, अपहरण आणि ९ वर्षांचा थरार! ९ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा गुंड जेरबंद; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Monday, 1 June 2026, 18:47
Next Post

खून, अपहरण आणि ९ वर्षांचा थरार! ९ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा गुंड जेरबंद; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.