Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात डीजेच्या तालावर नाचण्यावरून भयंकर राडा! “हा पठारावरचा आहे मारा याला” म्हणत १५ जणांकडून तरुणाला अमानुष मारहाण करत निर्घृण हत्या…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 3 August 2026, 15:35

पुणे: पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमादरम्यान किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर होऊन एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आतापर्यंत पाच अल्पवयीन आरोपींसह दहा जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव शुभम राजू घोडके (वय 22) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजेवर नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. आंबेगाव पठार आणि तुकाईनगर परिसरातील काही तरुणांमध्ये सुरू झालेला हा वाद जुन्या वैमनस्यामुळे अधिक चिघळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी शुभम घोडके हा जयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी सारसबाग परिसरात गेला होता. मिरवणूक पाहिल्यानंतर तो मेव्हण्यासोबत घरी परतत असताना वृंदावन नर्सरीजवळ काही तरुणांनी त्याला अडवले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी शुभमला ओळखून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि इतर वस्तूंनी हल्ला केला. या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला.

 

हल्ल्यानंतर शुभमला प्रथम घरी नेण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पाच अल्पवयीन आरोपींसह दहा जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास सुरू असून वादामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिस तपासत आहेत. खडकवासला मतदारसंघात मतदार पडताळणीला वेग; ६६ टक्के मतदारांपर्यंत ईएफ वितरण, नागरिकांना तातडीने फॉर्म भरण्याचे आवाहन

पुणे, ता. ३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २११ खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) मोहिमेला वेग आला असून, मतदार पडताळणी, Enumeration Form (EF) वितरण, डिजिटायझेशन आणि पंचनामे अपलोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत मतदारसंघातील ६६.०९ टक्के मतदारांपर्यंत ईएफ पोहोचविण्यात यश आले असून उर्वरित कामही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

रविवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मतदारसंघातील एकूण ५ लाख ९७ हजार ११४ मतदारांपैकी ३ लाख ९४ हजार ६६२ मतदारांना (६६.०९ टक्के) Enumeration Form वितरित करण्यात आले आहेत. यापैकी २ लाख ४१ हजार ७९१ अर्जांचे (४०.४९ टक्के) डिजिटायझेशन पूर्ण झाले असून ९ हजार ३७६ मतदारांनी स्वतःहून ईएफ सादर केले आहेत.

मतदारसंघातील ५०५ मतदान केंद्रांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व ५०५ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (BLO) प्रशिक्षण पूर्ण झाले असून ईएफ फॉर्मची छपाईही पूर्ण करण्यात आली आहे. पडताळणीदरम्यान ASD विसंगतीची २,२३७, DSEची १०,११४ आणि PSEची २४,१७३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, पत्ता न सापडलेले किंवा इतरत्र नोंद असलेल्या मतदारांचे पंचनामे तयार करून त्यांचे ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मतदार जनजागृतीसाठी १,८७० गृहनिर्माण सोसायट्यांपैकी ९१५ सोसायट्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच ५०५ मतदान केंद्रांपैकी २५६ केंद्रांवर मतदारसंख्या १,२०० पेक्षा जास्त असल्याने गोन्हे बुद्रुक, डोणजे, कुडजे आणि खडकवासला येथे चार नवीन मतदान केंद्रांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, उर्वरित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मतदारांनी आपला Enumeration Form संबंधित BLO कडे अथवा ऑनलाइन पद्धतीने तातडीने सादर करावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान वाढणारे गटांतील वाद आणि त्यातून होणाऱ्या हिंसक घटना ही चिंतेची बाब बनली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आमच्या लेकीला त्रास का देतो?’ सासरच्यांनी जावयाला भररस्त्यात धु-धु धुतलं; बायकोशी वाद घालणं नवऱ्याला जीवावर बेतलं….

Monday, 3 August 2026, 17:21

पूर्व हवेलीतील सोनारांकडून ‘सुवर्ण भिशी’च्या नावाखाली ग्राहकांकडून प्रतिमाह लाखोंची बेकायदा वसुली? ईडी-सीबीआय चौकशीची नागरिकांची मागणी!

Monday, 3 August 2026, 16:43

पोलिसांच्याच भरधाव व्हॅनचा रस्त्यावर तांडव! सदाशिव पेठेत एकामागून एक ७ गाड्यांना उडवलं; गाड्यांचा चक्काचूर

Monday, 3 August 2026, 16:38

भोर येथील भाटघर धरण 100% भरले; 45 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Monday, 3 August 2026, 16:04

राजगड तालुक्यातील करंजावणे गावात स्मशानभूमीचा अभाव; भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, ग्रामस्थांमध्ये संताप

Monday, 3 August 2026, 15:50

माळेगाव येथे महसूल विभागाचे ‘महाराजस्व अभियान’ शिबिर; विविध शासकीय सेवांचा नागरिकांना एकाच छताखाली लाभ

Monday, 3 August 2026, 15:44
Next Post

खडकवासला मतदारसंघात मतदार पडताळणीला वेग; ६६ टक्के मतदारांपर्यंत ईएफ वितरण, नागरिकांना तातडीने फॉर्म भरण्याचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.