Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वीज कडाडली अन् झाला हत्येचा खुलासा; उत्तर प्रदेशातून आरोपी अटकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 June 2025, 23:02

पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरात जोरदार पावसात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचा तपास भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या २० दिवसांत उलगडत आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसतानाही विजेच्या चमकणाऱ्या प्रकाशात ‘सीसीटीव्ही फुटेज’ मध्ये महिला एका रिक्षात बसताना दिसल्याच्या क्षणाने पोलिसांच्या तपासाला वेग दिला. अत्यंत कुशल आणि तांत्रिक पद्धतीने काम करत पोलिसांनी ३२०० किलोमीटरचा प्रवास करून आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली.

खून झालेल्या महिलेचे नाव प्रीती वाखारे (वय ३१) असून, आरोपीचे नाव शाहरुख शकील मन्सूर (वय २७, रा. हडपसर, मूळ गाव – अमखेरा, उत्तर प्रदेश) असे आहे. २० मे २०२५ रोजी रात्री पावसात ही घटना घडली होती. कात्रज ते नवले पूल मार्गालगत असलेल्या नाल्यात प्रीती यांचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला कोणताही पुरावा न मिळाल्यामुळे तपास अडचणीत आला होता.

‘सीसीटीव्ही’ तपासात मिळाला पुरावा
पोलिसांनी परिसरातील एकूण ३२० ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले. यामध्ये विजेच्या प्रकाशात एका फुटेजमध्ये महिला एका रिक्षात बसताना दिसली. ही रिक्षा अस्पष्ट असली तरी ‘टीव्हीएस’ कंपनीची असून काळ्या हूडची असल्याचे निष्पन्न झाले. या आधारे पुण्यातील १०,७९४ ‘टीव्हीएस’ रिक्षांची माहिती आरटीओकडून मिळवण्यात आली. वाहतूक पोलिसांनी यापूर्वी कारवाई केलेल्या १२०० रिक्षांची यादी पोलिसांकडे उपलब्ध होती. त्यातील १५० रिक्षांचे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासले, त्यात आरोपीची रिक्षा स्पष्ट झाली. तपासादरम्यान शाहरुख उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गाव अमखेरा (धामपूर) येथे पळून गेल्याचे समोर आले.

३२०० किलोमीटरचा प्रवास आणि अटक
भारती विद्यापीठ पोलिसांच्या विशेष पथकाने ३२०० किलोमीटरचा प्रवास करून आरोपीला अमखेरा गावातून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत शाहरुखने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

पाच गुन्ह्यांचा आरोपी
शाहरुखवर यापूर्वी चार लूटमारीचे आणि एक चोरीचा गुन्हा नोंदवलेला आहे. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे आणि त्यांच्या पथकाने साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला. आरोपीच्या रिक्षावर काळा हूड होता आणि इतर रिक्षांपेक्षा वेगळा देखावाही होता. त्यामुळे आरटीओकडून मिळवलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहतूक पोलिसांकडील फोटो यांच्या आधारावर आरोपीच्या रिक्षेची ओळख पटवण्यात आली. या तपासातून पुणे पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याची आणि चिकाटीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. अचूक कामगिरीने अत्यंत गुंतागुंतीचा गुन्हा काहीच दिवसांत उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

'या' राशींसाठी कठीण असेल आजचा दिवस; वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp