Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanjay Awte : प्रत्येकाला आपली ‘मन की बात’ मांडता आली पाहिजे : संजय आवटे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 11:05

पिंपरी : “बुद्धांचा देश आता निर्बुद्धांचा झाला आहे आणि आपण सारे हतबद्ध होऊन पाहत आहोत. प्रत्येकाला आपली ‘मन की बात’ मांडता आली पाहिजे अन् त्यासाठी साहित्यिकांनी भूमिका घेतलीच पाहिजे,” असे परखड विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत संजय आवटे यांनी व्यक्त केले.

मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी संजय आवटे बोलत होते. संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

संजय आवटे पुढे म्हणाले की, “ज्ञानोबा अन् तुकोबा हे मराठीतील दोन सर्वश्रेष्ठ साहित्यिक आहेत. कविता ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, म्हणूनच ती इंद्रायणीमध्ये बुडवावी, असे मंबाजींना वाटले होते. तेच मंबाजी आता तुकोबांच्या वेषात देहूमध्ये आले होते. आपण संतसाहित्याचे बोट सोडले अन् तिथेच खूप मोठी गडबड झाली.

 

वैविध्यपूर्णता ही भारताची खरी ओळख आहे अन् हीच ओळख जपण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे; अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. काळ आणि माध्यमं बदलली तरी आशय तोच आहे. महिलांची लक्षणीय संख्या आणि सोपान खुडे यांच्यासारखा अध्यक्ष हेच या संमेलनाचे मोठे यश आहे.”

अनिल पवार यांनी शिवराज्याभिषेकावर लेखन करण्याची संधी मला मिळाली याचा मनापासून आनंद झाला, अशी भावना व्यक्त केली. विलास लांडे यांनी, “राजकारणापलिकडे जाऊन साहित्याविषयी बोलताना तोलून मापून बोलावे लागते,” असे मत मांडले. प्रकाश रोकडे यांनी, “इंद्रायणीच्या परिसरात ज्ञानेश्वर, तुकोबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी विद्रोह केला.

त्याच नावाचे हे दूरदर्शी, पारदर्शी आणि बंधुतादर्शी साहित्य संमेलन आहे!” असे गौरवोद्गार काढले. अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून, “मोशी परिसरातील ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजावी म्हणून इंद्रायणी साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. या परिसरातील भूमिपुत्रांना विधायक कार्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून त्यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानित करीत आहेत,” अशी माहिती दिली.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रा. विकास कंद, रामदास जैद, डॉ. सुहास कांबळे, जितेंद्र माळी, मोहन भोसले, सुनील तापकीर, नीलेश गावडे, नाजीम शेख, राजेश बोराटे, गोरख मोरे, सविता खराडे यांचा समावेश होता. पुरस्कारार्थींच्या वतीने नाजीम शेख यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.‌

डॉ. सीमा काळभोर, रामभाऊ सासवडे, योगेश कोंढाळकर, अलंकार हिंगे, श्रीहरी तापकीर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, दामोदर वहिले, प्रा. डॉ. नागनाथ बळते, सुनील सस्ते, हिरामण सस्ते, अशोक ढोकले, काळूराम सस्ते, गणेश सस्ते, माणिक सस्ते, महीपती साठे, संतोष बारणे, दादाभाऊ गावडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

काम सुरू होतं… पुढच्याच क्षणी मृत्यू! महिलेसोबत घडलं भयंकर; पुण्यातील प्रसिद्ध मॉलमधील धक्कादायक घटना

Friday, 31 July 2026, 8:24

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा रौद्रावतार! पुणे-नाशिकला रेड अलर्ट, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा कहर

Friday, 31 July 2026, 8:00

Daily Horoscope: शुक्रवारचा महायोग! या राशींच्या आयुष्यात आज होणार मोठा बदल; तुमची रास आहे का? पहा

Friday, 31 July 2026, 7:37

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

Thursday, 30 July 2026, 23:01

‘आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक” ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली” शरीरसंबंध ठेवत त्याने…

Thursday, 30 July 2026, 22:24

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42
Next Post

संतापजनक! पुण्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर ३ आरोपींकडून सामुहिक अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.