Pimpri News : पुणे : पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे. ऑनलाइन जुगारातून ते करोडपती झाले होते. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, यापुढे होणाऱ्या विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचे मत मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली आणि त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले. परवानगी नसताना त्यांनी ऑनलाइन गेम खेळला, त्याचबरोबर गणवेशात माध्यमांमध्ये मुलाखत दिली. यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मालिन केली, असा आरोप करत, त्यांचे निलंबन करण्यात आले.
गेल्या आठवड्यामध्ये ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये झेंडे यांचा अव्वल क्रमांक आल्याने, त्यांना तब्बल दीड करोड रुपयांचे बक्षीस लागले. त्यांच्या कुटुंबीयांनी याचा आनंद साजरा केला. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत असतानाच प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. याच चुकीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. (Pimpri News ) पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली. ही चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे या करत होत्या. यामध्ये त्यांचे निलंबन करण्यात आले. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. आता पुढं विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणे मांडता येणार आहे.
पोलीस अधिकारीच जुगार खेळत असतील, तर समाजात काय संदेश जाणार?
झेंडे यांना क्रिकेटचे वेड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड त्यांना लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. (Pimpri News ) झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ऑनलाईन गेमच्या आहारी तरुणांनी जाऊ नये, यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, पोलीस अधिकारीच जुगार खेळत असतील, तर समाजात काय संदेश जाणार? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;
Pimpri News : सासरच्यांनी दिला त्रास ; जावयाने घेतला गळफास, वाकड परिसरातील घटना..
Pimpri News : साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे; पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे आवाहन