Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनी तिरुमला देवस्थान वाटणार एक लाख लाडू…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 17:17

पुणे : २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण देशवासीय आतुरतेने वाट पाहत आहेत. हा भव्य सोहळा अयोध्येत लवकरच पार पडणार आहे. देशभरातील काही महत्त्वाची दिग्गज मंडळी तसेच संत-महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होणार्‍या भक्तांना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थान भगवान व्यंकटेश्वराला अर्पण केला जाणारा प्रसिद्ध प्रसाद ‘श्रीवरी लाडू’ वाटणार आहे. त्यासाठी एक लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत.

 

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान एक लाख ‘श्रीवरी लाडू’ प्रसादाचे वाटप करण्याची घोषणा जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे कामकाज सांभाळत असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान यांनी केली आहे. मंदिर ट्रस्ट, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निमंत्रित यादीमध्ये सात हजारांहून अधिक लोक आहेत. यामध्ये राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती आणि अनेक मान्यवरांचा समावेश आहे. तिरुमला येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, टीटीडीचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी म्हणाले की, आम्ही अयोध्या कार्यक्रमात भाविक आणि व्हीव्हीआयपींना सदिच्छा म्हणून एक लाख लाडू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक सोहळा हा सनातन धर्माच्या सर्व अनुयायांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. देवस्थानचे प्राथमिक उद्दिष्ट हिंदू धर्म, संस्कृती आणि मूल्यांचा प्रसार करणे हे असल्याने, रामजन्मभूमी पूजेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला सन्मान वाटतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी लाखो भाविक येणार आहेत. मंदिरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष तयारी करण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून एकूण ८८९ लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात कोकणातून ३३७ जण, पश्चिम महाराष्ट्र ८४ जण, मराठवाडा १७ जण, विदर्भातून ३६ जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३५५ साधु-संतांना निमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान, भव्य अभिषेक सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पाहुण्यांना पाठवण्यात येत आहेत. पाहुण्यांच्या यादीत अनेक ऋषीमुनी आणि काही परदेशी निमंत्रितांचाही समावेश आहे. याशिवाय प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये भगवान राम आणि देवी सीता यांच्या भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पारंपारिक नागर शैलीत बांधलेल्या राम मंदिर संकुलाची लांबी ३८० फूट (पूर्व-पश्चिम दिशा), रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट असेल. मंदिराच्या संरचनेत प्रत्येकी २० फूट उंचीचे मजले असतील, ज्यात३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

शिरूर मतदारसंघातून कमळ चिन्हावरील खासदार निवडल्यास रखडलेले प्रश्न सुटतील : आमदार महेश लांडगे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.