Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रामटेकडी कचरा प्रकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध; प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 8 June 2025, 14:27

पुणे: पुणे महापालिकेने हडपसरमधील रामटेकडी येथे प्रस्तावित केलेल्या ७५ टन क्षमतेच्या नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला जोरदार विरोध सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली असून, हा प्रकल्प रहिवाशांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या प्रकल्पाच्या विरोधात माजी नगरसेवक योगेश ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नेते बंडू गायकवाड, नीलेश मगर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन प्रकल्प स्थगित करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर करत स्थानिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची सविस्तर माहिती दिली.

महापालिकेने रामटेकडी येथे जुन्या फर्निचर, गाद्या, चिंध्या, उशा आदी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रकल्प खासगी संस्थेला १५ वर्षांसाठी देण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ६६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कार्यकाळात स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता.

स्थानिक नागरिक व नेत्यांनी या प्रकल्पाविरोधात आरोग्यधोका असल्याची गंभीर भूमिका मांडली आहे. “हडपसर, मुंढवा, उरुळी देवाची, हांडेवाडी रस्ता, आणि हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये आधीच महापालिकेचे कचरा प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामुळे या भागातील पाच लाखांहून अधिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नवीन प्रकल्पामुळे प्रदूषण आणि दुर्गंधी आणखी वाढणार असून, हा निर्णय स्थानिकांवर अन्याय करणारा आहे,” असे ससाणे यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने कोणतेही जमीन संपादन न करता तातडीने हा प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाची योजना व अंमलबजावणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जर हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात आला नाही, तर नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्थानिक जनतेच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही.”

शहराच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबत कचरा व्यवस्थापन ही नक्कीच महत्त्वाची बाब आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाने या प्रकल्पावर पुन्हा एकदा सखोल विचार करून संवादातून योग्य तो तोडगा काढावा, हीच अपेक्षा.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
Next Post
Shikrapur police registered FIR against company after death of employee

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp