Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navale Bridge Accident: पुणे नवले पूल अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 November 2025, 21:44
Navale Bridge Accident: 5 lakhs assistance announced for the heirs of the deceased in the Pune Navale Bridge accident; Devendra Fadnavis' big announcement

Photo-Social Media

पुणे: आज सायंकाळी पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण (Navale Bridge Accident) अपघात झाला. या (Pune News) अपघातामध्ये सुमारे 7 ते 8 वाहनांचा (Devendra Fadanvis) समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही अहवालांनुसार या अपघातात एकूण 15 ते 20 वाहनांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर भुमकर पुलाजवळ एक कंटेनरचे नियंत्रण अचानक सुटले. त्याने पुढे असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये एक ट्रॅव्हलर बस पलटी झाली. त्या बसमध्ये सुमारे 18 ते 20 प्रवासी होते. सुदैवाने बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आणि मोठी जीवितहानी टळली.

मात्र पुढे उभ्या असलेल्या एका सीएनजी कारला कंटेनरने जबर धडक दिली, ज्यामुळे ती कार दोन कंटेनरमध्ये अडकली. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने भयंकर रूप धारण केले. या कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती असून, त्यामध्ये दोन पुरुष, एक महिला आणि सुमारे 4 ते 5 वर्षांचे एक लहान मूल अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच कंटेनरमधील चालक आणि क्लिनर यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण घटनेनंतर पुणे आणि पीएमआरडी अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू केले असून, हे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवून नागरिकांना त्या मार्गावरून जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार कंटेनरचे ब्रेक फेल होणे किंवा चालकाचे नियंत्रण सुटणे हेच अपघाताचे कारण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11
Next Post

Ajit Pawar: 'झालं गेलं गंगेला मिळालं, माझंही साहेबांवर प्रेम!' दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजितदादांचे संकेत; राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.