Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ढोल ताशा पथकांना महानगरपालिकेने सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी : धीरज घाटे

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 16 July 2025, 15:36

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला आणि सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशा पथके लयबद्ध पद्धतीने वाद्यवादन करून आपली सेवा गणरायाच्या चरणी रुजू करतात. पुण्यातील विविध ढोल-ताशा पथकांमधील वाद्यवादन उत्सवप्रेमी नागरिकांना मनापासून आवडते. या पथकांसाठी गणेशोत्सवापूर्वीचा सराव हा फार महत्त्वाचा असतो. आज पुण्यातील मध्यभागामध्ये अनेक ढोल-ताशा पथकांना सरावासाठी आवश्यक मैदाने उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांची भेट घेतली.

पुण्याच्या मध्य भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेली मैदाने तात्पुरत्या स्वरुपात ढोल-ताशा पथकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करणारे पत्र आयुक्तांना देण्यात आले. गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे. असे असताना पारंपरिक ढोल-ताशा पथकांना सरावासाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत. सरावामुळेच ही पथके गणेशोत्सवात तालबद्ध पद्धतीने वादन करू शकतात. विविध पथकांना सध्या सराव कुठे करायचा, हा प्रश्न भेडसावतो आहे. त्यामुळे महापालिकेची मैदाने पथकांना तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी राज्यातील भाजपा-महायुतीचे सरकार कायमच पुढाकार घेते. त्यात यंदापासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. असे असताना ढोल-ताशा पथकांना सरावासाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत, अशीच आमची भूमिका आहे.

 

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतली असून, महापालिकेच्या ताब्यातील मैदाने सराव पथकांना देण्यात यावीत, अशा सूचना पालिकेच्या मालमत्ता विभाग आणि क्रीडा विभागाला दिल्या आहेत. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवही जल्लोषात साजरा होईल.

शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समवेत माजी नगरसेवक अजय खेडेकर, बापू मानकर, रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी,सुनील पांडे, राजू परदेशी तसेच ढोल ताशा महासंघाचे ऍड अनिश पाडेकर व केतन देशपांडे उपस्थित होते.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

गॅस सिलिंडर झाले स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; आजपासून नवे दर लागू

Wednesday, 1 July 2026, 8:16

तुमच्या कार-बाईकवर इथेनॉल-20 चा काय परिणाम होणार? केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

Wednesday, 1 July 2026, 7:59

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! कोकण-विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Wednesday, 1 July 2026, 7:46

Daily Horoscope: जुलैच्या पहिल्याच दिवशी कोणाचे नशीब उजळणार? वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Wednesday, 1 July 2026, 7:33

वाकडकरांची सुरक्षा आता अधिक बळकट! मेट्रो स्थानकावर 60 मीटर लांबीचा पादचारी पूल कार्यान्वित

Tuesday, 30 June 2026, 22:58

एका रात्रीसाठी 2 लाख रुपये मोजायच्या ‘या’ मराठी अभिनेत्री! मुंबईत हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Tuesday, 30 June 2026, 21:44
Next Post

पंढरपूर हादरलं...! आई आणि मुलाची घरात घुसून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचं वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.