Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडगाव मावळमध्ये कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 August 2025, 12:00

पुणे, ता. 24: पुणे ग्रामीण, सातारा, रायगड जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, घातक हत्याराचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, मारहाण करुन जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, कट करुन खंडणी मिळविण्यासाठी खुन करण्यासाठी जबरदस्तीने पळवुन  नेऊन खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन खुनाचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या वडगाव मावळ येथील कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख किरण एकनाथ मोहिते (वय 20, रा. टि. 3 फलैट नं 201 व्हिजन बुडस, जांभूळ ता. मावळ जि. पुणे ), एकनाथ अर्जुन मोहिते (वय 53 रा. टि 3 फलेट नं 201 व्हिजन बुडस, जांभुळ ता. मावळ जि.पुणे ), रविद्र लक्ष्मण मोहिते (वय 33 रा. कुडेवाडा, वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे ) मयूर ऊर्फ चाण्या बजरंग मोठचे (वय 26, रा. मोरया चौक, दोरेवाडा, वाडगाव मावळ ता. मावळ जि.पुणे), करण रमेश पवार (वय 25 रा. टाकवे बा ता. मावळ जि.पुणे), सुशांत अनिल साबळे (वय 24 रा. केशवनगर, बडगाव मावळ ता. मावळ जि.पुणे) या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे आदेशाला कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीने संतोष रामभाऊ साळुंखे यांना तु आमच्या बापासाठी काय केलेस” असे म्हणुन  वाद घालून “तुला आता सोडत नाही, तुला दाखवतोच ‘अशी धमकी देवुन शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच संतोष साळुंखे यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत शाहरुक हनिफ अत्तार (वय 32 रा. चिखली, पुणे) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,191(2),191(3),190, 351(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. सर्व आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आर. आर. मोहिते यांनी 7 आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

 

दरम्यान, कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीवर कायद्याचा वचक रहावा व त्यांची दहशत असणाऱ्या परीसरात शांतता प्रस्थापित व्हावी. या दृष्टीकोनातून कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्ह्यांच्या संदर्भातील कागदपत्रांचे पडताळणी करुन कुख्यात गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का  कायद्यांतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच वरील गुन्ह्याचा तपास लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस उपनिरीक्षक आर. आर. मोहिते, अभिनीत सावंत, पासलकर, राजू मोमोग, सागर नामदास, तुषार भोईटे, आाबळे, पोलीस अंमलदार महेश बनकर, अमोल कसवेकर, किरण नांगरे, गणेश खेळकर, सिध्दार्थ वाघमारे यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post

फ्रेशर्स आयटी उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक; फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाला अटक  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.