Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार अशोक पवारांचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन चॅलेंज; म्हणाले माझ्या घोडगंगा कारखान्याच्या कर्जाच्या फाईलमध्ये चुका असतील तर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 July 2024, 12:48
MLA Ashok Pawar challenged openly to DCM Ajit Pawar over Ghodganaga sugar factory loan

मुंबईः घोडगंगा साखर कारखान्यासाठी कर्ज डावल्याने आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना ओपन चॅलेंज केले आहे. ‘एनएसडीसी’कडे सादर करण्यात आलेल्या कर्जाच्या फाईलमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधितांनी त्या दाखवाव्यात. माझ्या कारखान्याच्या कर्जाची फाईल शंभर टक्के बरोबर आहे. त्यावर मी समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहे, असे आव्हान आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

 

राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर तुम्ही अन्याय करणार असाल, तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत आमदार अशोक पवार यांनी अजित पवार यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली. फक्त आम्ही विरोधी पक्षात आहे, म्हणून निधी दिला जात नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्यातील १३ कारखान्यांना दोन दिवसांपूर्वी एनएसडीसीकडून 1800 कोटींपेक्षा अधिक कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना कर्ज दिले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली तुम्ही कायम पक्ष आणि बाजू बदलणार आणि केवळ मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. मी जरी घोडगंगा साखर कारखान्याचा प्रमुख असलो, तरी त्याचा सभासद शेतकरी आहे. कारखान्याच्या परिसरातील 25 मे ट्रॅक्टर ऊस सध्या पडून आहे. त्या शेतकरी सभासदांची नाराजी सरकार विरोधात वाढल्याशिवाय राहणार नाही. जर आमची अशी अडवणूक होत असेल तर आंदोलन करू, असा इशारा देखील आमदार अशोक पवार यांनी दिला आहे.

केवळ एखादा आमदार विरोधी पक्षात आहे, म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी आहे. आता आमदार म्हणून मी अजित पवार यांच्यासोबत नाही म्हणून मलाही निधी दिला नाही. अशोक पवार, राहुल जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असले, तरी कारखाना हा शेतकरी असलेल्या सभासदांचा असतो. केंद्र व राज्य सरकारने त्यांना करणे गरजेचे आहे. त्यांची अडवणूक करणे योग्य नाही. सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील हे शरद पवार यांच्यासोबत होते, त्यावेळी त्यांच्या कारखान्यांना पैसे दिले नाहीत. आता ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आल्यानंतर त्यांना तब्बल 500 कोटी रुपये दिले आहेत, असे देखील आमदार अशोक पवार म्हणाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52
Next Post

गरवारे महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अ‍ॅड. विजयानंद दुशिंग यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.