Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : चोर सक्रिय… घर रिकामं…पण पोलिस अधिक वेगवान! लोणी काळभोरमध्ये अवघ्या काही तासांत सुमारे 4 लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 February 2026, 21:55
Loni kalbhor 

photo- ppn

Loni kalbhor  : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील सुमारे 4 लाख 25 हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली होती. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पठारेवस्ती परिसरात 4 फेब्रीवारी ते 6 फेब्रुवारी यादरम्यान घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुरुवारी (ता.12) गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत आरोपीला अटक
करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

अदित्य अरुण गरड (वय 19, रा. फ्लॅट नं. 305, शुभयोग रेसिडेन्सी, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शांती शंकर सोलंकी (वय ३५, व्यवसाय मजुरी, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांती सोलंकी या कुटुंबासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहतात. सोलंकी या त्यांच्या वैयक्तिक कामानिनित्त 4 फेब्रुवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत बाहेरगावी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी घराला लॉक लावले होते. सोलंकी या 6 फेब्रुवारीला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या. तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.

सोलंकी यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, घरात कपाटात ठेवलेले 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चार कर्णफुले,8 ग्रॅम वजनाचे दोन जोड कानातील वेल, 7 ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, 14 नग चांदीच्या बांगड्या आणि एक चांदीचा कमरपट्टा असा चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणी सोलंकी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(3) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिस तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध होते. तेव्हा पोलिसांना ही घरफोडी आरोपी अदित्य गरड याने केली असून तो कदमवाकवस्ती परिसरात फिरत आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी अदित्य गरड याला गुरुवारी (ता.12) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हाची पोलिसांना कबुली दिली आहे. आरोपीकडून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अदित्य गरड याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कामगिरी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रामहरी वणवे, सागर जगदाळे, अंमलदार सुरज कुंभार, सचिन सोनवणे, राहुल कर्डिले, प्रवीण धडस, अशोक गिरी, प्रशांत सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली नाहे.

“परिसरातील घरफोडीच्या घटनांवर वेळीच लगाम घालण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांनी घराची सुरक्षितता वाढवावी व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”

स्मिता पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे) – लोणी काळभोर पोलीस ठाणे)

लोणी काळभोर पोलिसांचे होतेय सर्वत्र कौतुक

मागील दोन दिवसांत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर हल्ला करून लुटणाऱ्या चार आरोपींना अवघ्या 8 तासांत अटक, कुंजीरवाडीतील ‘ऑटो कॉर्नर’ पेट्रोल पंपातील 2 कोटी 63 लाखांच्या अपहारातील मॅनेजरला बेड्या, आळंदी म्हातोबाची येथे तरुणांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांवर कारवाई, आणि आता घरफोडीतील आरोपी एका दिवसात गजाआड! सलग कारवायांमुळे लोणी काळभोर पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post
Crime

Crime : सावध राहा! गरीबरथ एक्सप्रेसमध्ये चोरांचा सुळसुळाट; दोन प्रवाशांना एकाच वेळी घातला गंडा.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.