Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद! लोणी काळभोर पोलिसांनी महिलेला आत्महत्येपासून रोखले

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 June 2024, 14:38

लोणी काळभोर : घरात झालेल्या किरकोळ कारणावरून एका महिलेने फिनेल पिऊन रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील रेजेंद्र पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आज मंगळवारी (ता.4) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतीक्षा ढावरे (वय-35, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ढावरे यांचे सासु सासरे हे लोणी काळभोर येथील माळी मळा परिसरात राहतात. तर प्रतीक्षा ढावरे व तिचे पती पुण्यात राहतात. प्रतीक्षा ढावरे यांना दोन मुले आहेत. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे प्रतीक्षा ढावरे यांचे पती आईवडिलांकडे लोणी काळभोर येथे रागाने निघून आले होते.

प्रतीक्षा ढावरे या नवऱ्याला विनवणी करून परत घरी नेण्यासाठी सोमवारी (ता.3) आल्या होत्या. दरम्यान, प्रतीक्षा ढावरे व त्यांच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. या रागातून प्रतीक्षा ढावरे यांनी फिनेल पिले व रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी निघून गेल्या.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ईश्वर भगत व शिवाजी दरेकर हे तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांना प्रतीक्षा ढावरे या रेल्वेच्या रूळावर झोपलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना रूळातून बाहेर काढून आत्महत्येपासून रोखले. आणि प्रतीक्षा ढावरे यांना पोलीस ठाण्यात आणले.

प्रतीक्षा ढावरे यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिचे पती व सासु-सासऱ्यांना बोलावून घेण्यात आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार राजाराम फडतरे, महिला हवालदार होले यांनी प्रतीक्षा ढावरे यांना समुपदेशन केले.

थोड्या वेळानंतर प्रतीक्षा ढावरे यांनी फिनेल पिले असल्याने त्यांना उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर प्रतीक्षा ढावरे यांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रतीक्षा यांच्यावर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

लोणी काळभोर पोलिसांचे होतेय सर्वत्र कौतुक

या घटनेची माहिती मिळताच, समयसूचकता दाखवून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ईश्वर भगत व शिवाजी दरेकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रतीक्षा ढावरे या जीव देण्यासाठी रेल्वेच्या रूळावर झोपल्या होत्या. या दोन्ही पोलिसांनी बराच वेळ विनवणी केल्यानंतर त्यांना रेल्वे रुळावरून उठविण्यास यश मिळविले. त्यांनी दाखविलेल्या कार्यतप्तरतेमुळे महिलेचा जीव वाचला असून महिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आयटी हबची दुरावस्था चव्हाट्यावर! हिंजवडीत शेकडो IT इंजिनिअर्सचा एल्गार; आदित्य ठाकरेही आंदोलनात

Sunday, 6 September 2026, 13:01

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी बातमी! e-KYC सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल; सरकारने केला मोठा खुलासा

Sunday, 6 September 2026, 12:20

सोरतापवाडीत भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 6 September 2026, 11:59

मांजरी खुर्दमध्ये इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून मुद्देमाल लंपास

Sunday, 6 September 2026, 11:26

‘सातव’ आडनावाचा फायदा घेत वाघोलीतील 81 वर्षीय वृद्धेची बनावट सह्यांद्वारे 42 लाखांची फसवणूक, ‘भारती एअरटेल’सह 6 जणांवर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल..

Sunday, 6 September 2026, 11:04

गणेशोत्सवाआधी मोठी बातमी! कोकण प्रवासासाठी 6 स्पेशल ट्रेन; पुणे-रत्नागिरी रेल्वेचे वेळापत्रक समोर

Sunday, 6 September 2026, 10:48
Next Post
Congress Gowal Padavi wins from nandubar loksabha

महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी, हीना गावितांचा दारुण पराभव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp