Loni Kalbhor News: लोणी काळभोर, ता.18 : मागील तीन वर्षात लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धावणे, लांब उडी व गोळा फेकसह विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करून जिल्ह्यात आपला दबदबा कायम निर्माण केला आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आता स्पोर्ट्स फोर युनिक अथलेटिक्स स्पर्धेत 23 पदके मिळवून घवघवीत यश संपादन करून सुवर्ण कामगिरी केली आहे. या यशामुळे विद्यालयाचे व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातील बालकल्याण संस्था येथे स्पोर्ट्स फोर युनिक अथलेटिक्स स्पर्धा मंगळवारी (ता. 6) पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील रिले, गोळा फेक, धावणे, दोरी उडी, उंच उडी, क्रॉस जंप या क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी
11 गोल्ड, 7 सिल्वर व 7 ब्रास असे एकूण 23 पदके पटकाविले आहे.
बालकल्याण संस्था व्यवस्थापकीय अधिकारी पानसे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफी चा सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धुरदेव, क्रीडाशिक्षक कमलाकर नागोराव ढवळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत धुरदेव व शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धुरदेव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विजेत्या स्पर्धेकांवर लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. खेळाडूंच्या या कामगिरीमुळे शाळेचा मान जिल्ह्यात उंचावला आहे.
कांस्य
विजेत्या खेळाडूचे नावे (क्रीडा प्रकार – पदक ):
1) परी इंगुळकर (धावणे व स्पॉट बॉल थ्रो – सुवर्ण)
2) झोया शेख (धावणे – सुवर्ण,स्पॉट बॉल थ्रो-रौप्य पदक )
3)लक्ष्मी कांबळे : (स्पॉट अप – रौप्य पदक, दोरीच्या उड्या – कस्य)
4)भक्ती चौधरी (गोळा फेक – रौप्य, दोरीच्या उड्या – सुवर्ण)
5)सानवी पांगारकर (दोरीच्या उड्या – सुवर्ण, उडी मारणे – कस्य)
6)पुनम कांबळे (दोरीच्या उड्या व गोळा फेक – रौप्य पदक)
7)श्रावण जाधव (धावणे व स्पॉट बॉल थ्रो – सुवर्ण)
8)आयुष मिश्रा (धावणे व स्पॉट बॉल थ्रो – कांस्य)
9)नरेश शिंदे (गोळा फेक – कांस्य)
10)चैतन्य गायकवाड (अडथळा शर्यत – रौप्य पदक, उडी मारणे – सुवर्ण पदक)
11)रोहन जगदाळे (उडी मारणे – सुवर्ण, अडथळा शर्यत-कास्य )
12)केतन जगताप (गोळा फेक व उडी मारणे – सुवर्ण)






