Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चोर की सैतान…! अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 10 December 2024, 16:28

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. यावेळी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, अज्ञात चोरट्याने महिलेच्या मृतदेहाच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंगल वसंतराव गाडे (५४, रा. येलवाडी, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती वसंतराव भिकाजी गाडे (६९, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो ट्रॅव्हलवरील अज्ञातचालक आणि अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर वाकी खुर्द गावाच्या हद्दीत ७ डिसेंबर रोजी हा अपघात घडला.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंतराव गाडे आणि त्यांच्या पत्नी मंगल गाडे हे वाकी खुर्द येथून चाकणकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दोघेही पती-पत्नी रस्त्यावर पडले. त्या वेळी मंगल गाडे यांच्या डोक्यावरून टेम्पो ट्रॅव्हल्सचे चाक गेले. या अपघातात मंगल गाडे यांचा जागीच मृत्यू झाला.

 

या अपघातानंतर जखमी पती आणि मृत पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. त्या वेळी मयत पत्नीच्या गळ्यात पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र होते. मात्र, मयत गाडे यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह पाहण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात गेले असता मृतदेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत बोलताना चाकण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेश मोरे म्हणाले कि, गाडे यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनाची माहिती मिळाली असून, चालकाला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच, मृतदेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र कोणी चोरून नेले, याचा देखील तपास सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही लोकांवर पोलिसांचा संशय असून लवकरच आरोपी पकडण्यात येईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनंत चतुर्दशीआधी दर घसरले, पाहा दर

Thursday, 24 September 2026, 12:23

बारामतीत बनावट मृत्युपत्राच्या आधारे जमीन हडपण्याचा आरोप; फेरफार नोंद करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 24 September 2026, 11:57

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला! शिरुरमध्ये बाजरी, मका, ऊस पिके भुईसपाट

Thursday, 24 September 2026, 11:22

गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ‘तगडा प्लॅन’; 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 2 हजार सीसीटीव्हींची नजर – आयुक्त अमितेशकुमार

Thursday, 24 September 2026, 11:18

दूध भेसळ प्रकरणात तुकाराम मुंडेंचा दणका! 17 लाखांच्या संशयास्पद व्यवहारात दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Thursday, 24 September 2026, 11:10

शिरसवडीत दरवाजा उघडा दिसला अन् चोर घरात शिरला! महिलांचे सोन्याचे दागिने चोरले, आरडाओरड करताच झाला पसार

Thursday, 24 September 2026, 10:47
Next Post
79 people cheated for seven crore rupees in narayangaon area pune

जादा परतावा देण्याच्या आमिषाने नारायणगाव परिसरातील ७९ जणांची साडेसात कोटींची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp