पुणे: फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील एस एस मोबाईल शॉपीचे शटर उचकवून आठ मोबाईल चोरल्याची घडली होती. ही घटना ८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी समशुद्दीन युसुफ कादरी (वय २४ वर्षे) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, ८ जानेवारीला सकाळी ६ वाजेच्या सुमारास फुरसुंगीतील मंतरवाडी चौक येथील एस एस मोबाईल शॉपीचे शटर उचकवुन आतमध्ये प्रवेश करुन दुकानातील १ लाख ६१ हजार तीनशे रुपयांचे ८ मोबाईल संच चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली होती. त्यानंतर मोबाईल शॉपीचे मालक समशुद्दीन युसुफ कादरी (वय २४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा ठी सर्वेन १५७, हॉटेल पानेरी, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यातील आरोपी हे पुर्वी पुणे शहर पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी असल्याचे फुरसुंगी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड आणि श्रीनाथ जाधव यांनी त्यांना ओळखले. त्यानंतर गोपनीय बातमीदारकडून आरोपींच्या राहत्या घरचा पता लागला नाही. तेंव्हा आरोपी वापरत असलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून तपास पथक अधिकारी व अमलदार यांनी सापळा रचुन आरोपी वैभव ऊर्फ गोटया राजाराम तरंगे(वय २१ वर्षे, रा दत्तवाडी, उरुळीकांचन, हवेली, पुणे), ओमकार ऊर्फ बुट्टया संतोष सातपुते( २० वर्षे, रा. पेंट कॉलनी, धायगुडे वस्ती, नऱ्हे, पुणे), राजन विनोद शहा फ्लॅट नं ३०२, भैरवनाथ मंदीराजवळ, धायरी, पुणे), प्रफुल्ल ऊर्फ रामा सुभाष पिलवंते(वय २३ वर्षे रा. उरुळी कांचन, हवेली, पुणे) यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून एकूण ६ मोबाईल हॅन्डसेट व एक मोटार सायकल असा एकुण १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांच्या मागदर्शनाखाली अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, मंगल मोढवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजेश खांडे, पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख, पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, निलेश गायकवाड, सतिश काळे, सागर वणवे, अमोल जाधव, निखील पासलकर, अभिजीत टिळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.






