Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरे परिसरात ‘पीएमपीएल’ च्या बस फेऱ्या कमी; विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, परिसरातून प्रशासनाच्या निर्णयाला विरोध…

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 8 July 2025, 16:52

न्हावरे: पुणे ते न्हावरे(ता. शिरूर)दरम्यान धावणाऱ्या पीएमपीएमएल (पीएमटी) बस फेऱ्यांची संख्या प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे मोठ्या प्रमाणात कमी केल्याने स्थानिक विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि इतर प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मागील दोन वर्षांपासून पुणे-वाघोली-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे मार्गे न्हावरे येथे नियमित बस सेवा सुरु होती. दिवसभरात पुणे ते न्हावरे पाच वेळा तर शिक्रापूरवरून देखील पाच वेळा बस सेवा उपलब्ध होती. याचा लाभ न्हावरे परिसरातील उरळगाव, निर्वी, निमोणे, गुनाट, आंधळगाव, आंबळे, दहिवडी, पारोडी या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत होता.

परंतु अलीकडे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत तब्बल ८० टक्के बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी आणि नोकरदार व व्यापाऱ्यांना कामासाठी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकांना ट्रक, पिकअप किंवा इतर खासगी वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर न्हावरेच्या सरपंच कमल कोकडे यांनी बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. “बस सेवा नियमित सुरू राहणे गरजेचे आहे. प्रशासनाने अचानक निर्णय घेऊन संपूर्ण परिसराच्या दळणवळण यंत्रणेवर परिणाम केला आहे” असे कोकडे यांनी सांगितले.

 

दरम्यान बस फेऱ्या का कमी करण्यात आल्या याबाबत वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. “स्थानिक प्रशासनाने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने बस सेवा पूर्ववत करावी” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“बेबी, मी फ्रान्सवरून येतोय!” कस्टमच्या नावाने पैसे मागितले अन् पुण्यातील महिलेला 21.89 लाखांचा गंडा

Sunday, 30 August 2026, 10:07

मावळसह शिरूर येथे उभारणार नवीन MIDC; पुण्याच्या उद्योगविश्वासाठी मोठी बातमी

Sunday, 30 August 2026, 9:44

25 लाखांची डील, 5.5 लाखांची लाच अन् ACBचा सापळा! गर्भलिंगनिदान रॅकेट आलं समोर पण पोलिसांनी लाच घेऊन केली ‘सेटलमेंट’

Sunday, 30 August 2026, 9:31

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54
Next Post

UPI होतंय आणखी स्मार्ट! आता अॅपशिवाय पेमेंट; कार, स्मार्टवॉच आणि टीव्हीद्वारे थेट व्यवहार 'कसा' करता येणार जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp