Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरुणांच्या सतर्कतेमुळे निराधार आजींना मिळाला हक्काचा निवारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 January 2024, 16:34

राजेंद्रकुमार शेळके

 

पुणे : आजकालची तरुण पिढी बिघडत चालली आहे. नात्यांची जाण नाही, वयोवृद्धांबद्दल आदर, आत्मीयता नाही… असे संवाद अनेकदा कानी पडतात. मात्र, ही दूषणे फोल असल्याचे याच तरुण पिढीने दाखवून दिले असून, आदर्शवत कामगिरी केली आहे. रस्त्याच्या कडेला रडवेल्या अवस्थेत बसलेल्या निराधार आजीला खराडी (पुणे) येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हक्काचा निवारा मिळवून दिला आहे.

खराडी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘सोशल फार्मसी’ या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या फील्ड व्हीजट दरम्यान एका वृद्धाश्रमाला भेट दिली. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयाचे विद्यार्थी मंदार पठारे, यश पठारे, सुकृत निकम, हंसिका राठोड हे महाविद्यालयात येत असताना त्यांना एक आजी रस्त्याच्या कडेला रडवेल्या असस्थेत दिसल्या. नुकतीच मुलांनी वृद्धाश्रमाला भेट दिली होती. त्यामुळे त्यांनी आजीचे दुःख अचूक जाणले.

मुलांनी आपुलकीने आजीबाईंची चौकशी केली. त्यावेळी मुलांना त्यांनी हक्काने कुठेतरी राहण्याची सोय करण्याची विनंती केली. आजीची अवस्था पाहून मुलेही रडवेली झाली. या परिस्थितीत मुलांना नुकत्याच भेट देऊन आलेल्या वृद्धाश्रमाची आठवण झाली. त्यांनी लगेच दूरध्वनी करून एन.एस.एस. अधिकारी प्रा. प्रियंका बोरुडे यांना याबाबत कल्पना दिली. प्रा. बोरुडे यांनी तत्काळ कॅब बुक करून या आजींना ‘माहेर’ वृद्धाश्रमात दाखल केले आणि आजींना एक हक्काचा निवारा मिळवून दिला.

शैक्षणिक जीवन जगत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रा. प्रियंका बोरुडे यांचे कौतुक केले. तसेच त्यांनी केलेल्या या विधायक कामासाठी शुभेच्छा दिल्या.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Man attacked by goon in thergaon pimpri chinchwad

पिंपरीतील थेरगावमध्ये भरदिवसा तरुणावर वार करत टोळक्याची हवेत कोयते फिरवत दहशत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.