पुणे: पुणे जिल्ह्यात अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट्स) संख्या वाढत चालली असून रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात सर्व संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४२ ब्लॅकस्पॉट्स असून त्यात पुणे महापालिका हद्दीत १५, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या क्षेत्रात २२, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या क्षेत्रात २, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या हद्दीत १ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत २ अपघातप्रवण ठिकाणांचा समावेश आहे.

या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात, जसे की ठराविक कालावधीसाठी वाहतुकीवर निर्बंध, दिशादर्शक फलक लावणे, राडारोडा हटविणे, बॅरिकेडिंग करणे इत्यादी. या उपाययोजनांची अंमलबजावणी पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्यक्ष तपासणी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
डुडी म्हणाले की, गेल्या एका वर्षात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांचे ठिकाणनिहाय विश्लेषण करणे गरजेचे आहे. या ठिकाणी अपघात होण्याची नेमकी कारणे शोधून त्यानुसार सुरक्षा उपाय सुचवावेत आणि ते वेळेवर राबवावेत. यामुळे भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळता येईल. खडकवासला धरण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने वाहतूक पोलीस नेमावेत. तसेच रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे प्रतिनिधी, पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिका







