Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: ‘माझा भाऊ समाजकार्य करतो, तो कला केंद्रावर गेला हे शॉकींग’ अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरणावर आमदार मांडेकरांची पहिली प्रतिक्रिया

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 July 2025, 15:09

पुणे: दौंड तालुक्यातील चौफुला येथे असलेल्या अंबिका कला केंद्रावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या प्रकाराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांचं नाव समोर आलं असून, पोलिसांनी त्यांना व आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

 

हे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ता वापरून गुन्हे दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द आमदार शंकर मांडेकर यांनी प्रथमच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली असून, भावाच्या चुकीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत पोलिसांनी कठोर कारवाईच करावी अशी ठाम भूमिका मांडली आहे.

“मी कोणालाही वाचवण्यासाठी पोलिसांना फोन केलेला नाही”

भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “माझ्या भावाचं नाव या प्रकरणात असल्याचं मला पोलिसांच्या माध्यमातून कळलं. त्यानंतर मीच स्वतः पोलिसांना सांगितलं की योग्य ती कारवाई करा, मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. कालपर्यंत या प्रकरणाची मला माहितीही नव्हती. पोलिसांचा फोन आल्यानंतरच हे समजलं आणि मी लगेचच माझ्या भावाला पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितलं.”

बंदुकीचा परवाना नव्हता, तरी गोळीबार कसा झाला?

या प्रकरणात गोळीबार नेमका कोणी केला, याबाबत अद्याप तपास सुरू आहे. मांडेकर यांनी सांगितलं की, “माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नाही. त्याच्यासोबत जे दोन-तीन लोक होते, त्यापैकी गणपत जगताप याच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. नेमकं काय घडलं, हे पोलिसच तपासून सत्य बाहेर काढतील.”

भावाचं कला केंद्रावर जाणं धक्कादायक – आमदार मांडेकर

मांडेकर पुढे म्हणाले की, “माझा भाऊ साधं-सरळ आयुष्य जगतो, शेती करतो, वारकरी संप्रदायाचं काम करतो, कीर्तन करत असतो. त्यामुळे त्याचं कला केंद्रासारख्या जागी जाणं हेच माझ्यासाठी धक्कादायक होतं. आपण कसं वागायचं हे ठरवायला हवं. माझा भाऊ त्यांच्या बरोबर गेला, हे पूर्णपणे चुकीचं आहे.”
भावाच्या वागणुकीवर निराशा व्यक्त करताना मांडेकर म्हणाले, “चार भाऊ असतात, त्यात एक चोर असतो, एक देव असतो. प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो आणि त्याच्या कृत्यांसाठी तोच जबाबदार असतो. कोणतीही चूक केल्यास शासन त्याला शिक्षा देईल.”

“दबाव नाही, कारवाई व्हायलाच पाहिजे”

विरोधकांकडून लावण्यात येणाऱ्या आरोपांवर उत्तर देताना मांडेकर म्हणाले की, “मी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही. मी पोलिसांना कोणताही फोन केलेला नाही. उलट मीच सांगितलं की तो माझा भाऊ असला तरी तुम्ही कारवाई करा. मी मध्ये येणार नाही. कायद्याच्या पुढे कोणीही नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे.”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

सार्वजनिक गणेशमंडळांना हायकोर्टाचा दिलासा! सहा फुटांहून उंच पीओपी गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.