Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात आता अनाथांना कोर्ससाठी कोणतेही शुल्क लागणार नाही; चंद्रकांत पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 13 January 2024, 21:14

पुणे : अनाथांना महाराष्ट्रात एक टक्का आरक्षण सुरु आहे. यामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या. स्पर्धा परीक्षांची फी देखील कमी केली आहे. आता अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडे हे काम असून, हा मोठा निर्णय झाल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तर्पण फाउंडेशनतर्फे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराच्या कमलनयन बजाज अतिथी गृहात पार पडला. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय, प्रकल्प संचालक ऊर्जा भारतीय, इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, पुण्यातील संचालक संजय भोसले, अशोक गुंदेचा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. यावर्षी पुण्यातील विजय फळणीकर यांना ‘आपलं घरं’ संस्था, नाशिकमधील स्वामी नारायण मंदिराचे प.पू. माधव स्वामी महाराज आणि अमरावतीमधील गुंजन गोळे यांच्या ‘गोकुळाश्रम’ संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘परमेश्वराने भेदभाव निर्माण केला नाही. मात्र, आपण जाती, पंथ, भाषा, उपासना पद्धती यावर भेदभाव निर्माण केला. हा समाज माझा आहे, दुसऱ्याचे दु:ख आपले मानून तर्पण फाउंडेशनसारख्या संस्था कार्यरत आहेत. हिंदू तत्वज्ञानात माणसाला कसे जगावे हे शिकविण्यात आले. माझ्या समाजाची काळजी मी करणे, हा धर्म आहे, हे स्वामी विवेकानंद यांनी शिकविले. हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. त्यांना जिजामातांनी घडविले. त्यामुळे त्यांचे कार्य आपल्याला आदर्शवत आहे’.

डॉ.सुरेश गोसावी म्हणाले, बालसुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न मुलांसमोर असतो. त्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचे आयुष्य चांगले घडू शकते. त्यांच्यासाठी काम करणारी ही संस्था आहे. ही संस्था आणखी मोठी व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

श्रीकांत भारतीय म्हणाले, तर्पण फाउंडेशन हे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अनाथ मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तर्पण फाउंडेशनचे संचालक आहेत. फाउंडेशनमार्फत अनाथ मुलांच्या शिक्षणाबरोबरच नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. शिक्षण आणि नोकरी झाल्यानंतर मुलांचे विवाह जुळविणे आणि थाटात लग्न लावून देण्याचे कार्यसुद्धा फाउंडेशन करते. त्यामुळे अशाप्रकारे अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
The Greatest Fielding Efforts In Cricket History BBL Viral Catch

क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच झाला नाही अन् होणारही नाही! डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसेना; पाहा व्हिडिओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp