पुणे : पुण्यातील चाकरमान्यांसाठी मोठी बातमी आहे. पुढील आणखी काही दिवस भिडे पूल बंद राहणार आहे. अशातच नागरिकांना अजूनतरी पर्यायी मार्गाचाच वापर करावा लागणार आहे. भिडे पुलावरून रोज हजारो गाड्या ये-जा करतात पण हा पूल आता आणखी काही दिवस प्रवासासाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भिडे पूल आणखी किती दिवस बंद राहणार? जाणून घ्या…

गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणारा भिडे पूल अजून दीड महिने बंद राहणार आहे. सदाशिव पेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकाकडे जाण्यासाठी मार्चमध्ये महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही म्हणून आणखी काही दिवस भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम मार्च महिन्यात सुरू करण्यात आले होते. व 6 जूनपर्यंत ते पूर्ण करून भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महामेट्रोचा दावा होता. पण अजूनही काम झालेले नाही म्हणून, महामेट्रोने 15 ऑगस्टपर्यंत पूल बंद ठेवण्याची परवानगी वाहतूक पोलिस आणि पुणे महापालिकेकडे मागितली आहे.

दरम्यान, पुणेकरांची गैरसोय न व्हावी यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग खुले केले आहेत. पण असे असतानाही प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.







