Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Belhe news : वाहतुकीच्या नियमांचे पालन करा आणि रस्ता अपघात टाळा – मोटार वाहक निरीक्षक तानाजी धुमाळ

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 9 September 2023, 17:28

शुभम वाकचौरे

Belhe news : जांबूत  : शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना एक जबाबदार नागरिक बनावे.
दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे. मद्य प्राशन करून वाहने चालवू नयेत. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि रस्ता अपघात टाळा. असा संदेश मोटार वाहक निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी दिला.

बेल्हे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलात नुकतेच रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Belhe news) यावेळी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहक निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक तेजश्री कुलकर्णी, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत नलावडे, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Belhe news) समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील मोटार वाहक निरीक्षक (आरटीओ) तानाजी धुमाळ म्हणाले की, रस्त्यावर बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. (Belhe news) अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची आकडेवारी पाहता तरुण वयोगटातील बहुसंख्य असल्याचे दिसून येते.

युवा वर्गात रस्ता सुरक्षा विषयाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक आहे. म्हणूनच महामार्ग पोलिसांनी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती चे काम हाती घेतलेले आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा चालक असल्याने त्यांच्यात जागृती झाल्यास भविष्यात अपघातांना आळा बसू शकतो.

शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना एक जबाबदार नागरिक बनावे. रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी ट्रिपल सीट गाडी चालवणे, कट मारणे, वेग मर्यादा वाढवणे, वळणावर वेग वाढवणे, चार चाकी मध्ये सीट बेल्ट न लावणे यांसारख्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. (Belhe news) बहुतांशी अपघात हे वेळेवर उपचार न मिळाल्याने होत असतात. म्हणूनच अपघात स्थळी जखमींना तात्काळ मदत ही केली गेली पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय कंधारे यांनी तर आभार समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे तरुणाच्या बेतले जीवावर ; चुकून झाडली गेलेली गोळी घुसली मित्राच्या मानेत, हवेली तालुक्यातील घटना..

Pune News : मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी जावयाचे अपहरण ; गोठ्यात बांधून मारहाण, येरवडा परिसरातील घटना..

Pune News : पुणे जिल्ह्यात एका महिन्यात चार सर्पमित्रांना सर्पदंश दोघांचा मृत्यू तर दोघे सुरक्षित..

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Pimpri News : जिद्दीला सलाम! दिव्यांग असतानाही वैष्णवीने मिळवले विशेष यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.