Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऋषिकेश कामठेला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; न्यायालयाने ठोठाविली 4 दिवसांची पोलीस कोठडी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 July 2024, 11:39
Loni Kalbhor police arrested man who molest minor girl pune

लोणी काळभोर : लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी, धमकी, दरोडा व लुटमार या सारखे गुन्हे दाखल झालेल्या ऋषिकेश कामठेला  लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता. २७) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

ऋषीकेश रामचंद्र कामठे (वय-२८, कामठे बिल्डींग, आदर्श चौक, महादेवनगर, हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी ओम कृष्णा गुरुंग (वय २२, रा. ग्रिन रोड पॉवर वस्ती, कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम गुरुंग हे एक हॉटेल व्यवसायिक आहेत. हॉटेल व्यवसायाच्या धंद्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, ऋषीकेश कामठे व त्याचे साथीदार विनय ससाणे, कृष्णा लोया, अक्षय कांचन, प्रतिक कांचन, प्रकाश खोले व त्याच्या दोन अनोळखी मित्रांनी फिर्यादी ओम गुरुंग यांना शुक्रवारी (24 मे २०२४) भेटण्यासाठी बोलावले होते.

त्यानुसार फिर्यादी हे भेटण्यासाठी गेले. ऋषीकेश कामठे याने फिर्यादी ओम गुरुंग यांना दमदाटी केली आणि म्हणाला तू गायी, म्हशी पकडण्याच्या नावाखाली पैसे खात आहेस, अशी बातमी मिळाली आहे. तुला राहायचे आहे की नाही? असे म्हणून फिर्यादींच्या मोबाईलची तपासणी केली.

त्यानंतर आरोपी ऋषीकेश कामठे, विजय ससाणे, कृष्णा लोया यांनी फिर्यादी ओम गुरुंग व त्यांचा मित्र पार्थ यांना लोणीकाळभोर येथील भवानी माता मंदीर येथे घेवून गेले. तेथे आरोपींचे आणखी दोन अनोळखी मित्र आले. कृष्णा लोया याने फिर्यादी यांचा मित्र पार्थ सातपुते यास अलीकडेच थांबवून घेतले. तर उर्वरित आरोपींनी फिर्यादी ओम गुरुंग यांना तुझ्याशीच बोलायचे आहे, असे म्हणत त्यांना एमआयटी कॉलेजच्या पाठीमागील मोकळया जागेत घेऊन गेले. तू गायी-म्हशींची पैशांची भाड खातो, असे म्हणुन फिर्यादी यांना त्यांनी कमरेच्या पट्टयाने व लाथा बुक्क्यांनी हात, पायावर, छातीत, पाठीत, डोक्यावर मारहाण करुन जखमी केले.

दरम्यान, अर्ध्या तासानंतर आरोपी अक्षय कांचन व प्रतिक कांचन हे दोघेजण तेथे आले व फिर्यादींना म्हणाले, तूच अक्षयकडे पिस्टल असल्याची टीप पोलीसांना दिली आहेस, असे म्हणत त्या दोघांनी कमरेच्या पट्ट्याने पुन्हा फिर्यादी यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी ओम गुरुंग यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

तसेच प्रकाश खोले याच्या मित्राने फिर्यादींच्या जवळ असलेला युबॉन कंपनीचा ब्लुटुथ हेडफोन काढून घेतला. तसेच ऋषीकेश कामठे याने जबरदस्तीने 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी ओम गुरुंग यांना रात्री बारा वाजेपर्यंत बसवून ठेवले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय बागवे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ऋषीकेश कामठे याचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी ऋषीकेश कामठेला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी ऋषीकेश कामठेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पुणे शहर आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, पोलीस हवालदार प्रशांत कळसकर, मल्हारी ढमढेरे, व सोमनाथ गळाकाटे यांच्या पथकाने केली आहे.

अद्यापही ७ साथीदार फरार

पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांच्या टोळीने ओम गुरुंग यांना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून लुटले होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ऋषीकेश कामठे याला अटक करण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यातील उर्वरील आरोपी अद्यापही फरार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

1 मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक! भाषा येत नसेल तर परवाना रद्द होणार; परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा

Tuesday, 14 April 2026, 16:15

पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडीतील ‘कोंडी’वर प्रशासनाचा हातोडा; बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांच्या प्रयत्नांना यश; दोन जुने दुभाजक बंद, तीन नवे बदल..

Tuesday, 14 April 2026, 16:09
Pune-Solapur railway

पुणे ते गाझीपूर विशेष रेल्वे 1 मेपासून धावणार; प्रवाशांची गर्दी आणि वेटिंग लिस्टचं टेन्शन आता विसरा

Tuesday, 14 April 2026, 16:03

पुणे पोलिसांना आता हेल्मेट सक्ती! विनाहेल्मेट दिसल्यास फोटो काढा अन् “PTP” ॲपवर पाठवा; खुद्द वाहतूक उपायुक्तांचे आवाहन

Tuesday, 14 April 2026, 15:39

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक अन् फिल्मी स्टाईल हाणामारी; 40 ते 50 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Tuesday, 14 April 2026, 15:30

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01
Next Post

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे धडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.