Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

…म्हणून कट्यारे व्यथित; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपांवर जिल्हाधिकाऱ्यांचे जोरदार उत्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 31 May 2024, 22:01

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप त्या पत्रामध्ये केला आहे.

 

जोगेंद्र कट्यारे यांनी काय केला आरोप?

खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे म्हणाले कि, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌

सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे.‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे, असा आरोप कट्यारे यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे जोरदार प्रत्युत्तर

जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले की, माझ्यावर आरोप असलेले पत्र मी आज पाहिले, मी एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत असतो. माझ्यावर आरोप करणाऱ्या कट्यारे यांनी यात गल्लत केली आहे. कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार शासनाला आहे.

मी जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्याची चौकशी करण्यात येते आहे. कट्यारे यांच्याकडून जमीन अधिग्रहणाची भरपाई देण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.

प्रांताधिकारी कट्यारे यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले असून नियमभंग केलेला आहे. कट्यारे यांनी जर चुकीचे काही केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याचे कारण नाही. राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही, मी पुणे जिल्ह्यातील २१ आमदारांसोबत आणि चार खासदारांसोबत काम करतो, असे प्रत्युत्तर सुहास दिवसे यांनी दिले.

प्रांताधिकारी कट्यारेंच्या तक्रारीला दिलीप मोहितेंच उत्तर

आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले कि, म्हणाले की, पुण्यातील खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी कायतरी पाप केलं आहे, म्हणूनच मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्यांना द्यावी लागत आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. येत्या अधिवेशनात मी प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करणार आहे, असे दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

शिरूर तालुक्यातील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप...! पिकअप चालवताना दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.