Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बहुचर्चित तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाला लवकरच मंजुरी; संसदेतील प्रश्‍नोत्तराच्या तासाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उत्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 15:47

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून, त्याचा डीपीआरदेखील तयार आहे. हा विस्तृत प्रकल्प अहवाल दिल्ली येथे मंजुरीसाठी आला असून, लवकरच त्याला मंजुरी दिली जाणार असल्याचे संकेत स्वतः केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग तसेच देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान या मार्गांवरील कोंडी कमी करण्यासाठी महामार्गाचे काम सुरु होणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (ता. २१) मावळचे खासदार श्रीरंग बारणे प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून देहूरोड सेंट्रल चौक-किवळे-वाकड-चांदणी चौक मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडणाऱ्या मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मात्र, अद्याप या मार्गांचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी येथे जाणारी अवजड वाहने, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कडे (मुंबई-बेंगलोर महामार्ग) जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या दोन्ही मार्गावरील कामाला मंजुरी कधी मिळेल आणि काम कधीपर्यंत सुरु होईल?

या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, ‘पुणे-मुंबई मार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक होते. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून, त्याचा डीपीआरदेखील तयार झाला आहे. तो विस्तृत प्रकल्प अहवाल दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे.

 

या वेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर नवीन द्रुतगती मार्ग बनवला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेल्या कार्पोरेशनला बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम देण्याबाबत विचार सुरु आहे. याच दरम्यान तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानचा देखील उन्नत मार्ग बनवला जाणार आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासह मुंबई-बेंगलोर महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौक-रावेत-पुनावळे-चांदणी चौक या दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून, त्याच अनुषंगाने आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. पाठपुरावा यशस्वी ठरत असून, लवकरच उन्नत मार्गाला मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होईल, असे खासदार बारणे यांनी प्रसिद्धी पत्रकात महटले आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

पुणे विद्यापीठाचा एम.बी.ए. प्रथम सत्राचा पेपर फुटला; परीक्षा रद्द, 'या' तारखेला पुन्हा परीक्षा होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.