Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडून २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; दावडी येथील रहिवासी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 23 February 2024, 9:36

राजगुरुनगर : लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरून दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या २१ वर्षीय युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाला यश आले आहे.

साक्षी रमेश होरे (रा. म्हासाडे कान्हूरकर वस्ती, दावडी, खेड, पुणे) असे या मुलीचे नाव असून, ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी हिचे चुलते विकास किसन होरे (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

साक्षी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी (ता. २१) ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे फिरायला आली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरून दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीमध्ये पडली. त्याठिकाणी कड्याच्या वर एका ठिकाणी एक बॅग आणि चप्पल आढळून आल्याने तेथील एका व्यावसायिकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळवली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिवदूर्ग मित्र या बचाव पथकाला देखील त्याठिकाणी पाचारण केले. मात्र, जास्त रात्र झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गुरुवारी (ता. २२) सकाळी सहा वाजता शिवदूर्ग बचाव पथक लायन्स पॉईंट या घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले, सीताराम बोकड, सचिन शेलार हे देखील लायन्स पॉईंट या ठिकाणी पोचले होते. रेस्क्यू पथकातील काही तरुण रोपच्या सहाय्याने दरीमध्ये उतरले. शोध घेतला असता दगडांमध्ये पडलेला साक्षी हिचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर मृतदेह दोरीच्या साहाय्याने दरीमधून वर काढण्यात आला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिक्षक-पदवीधरांच्या निकालाची उत्सुकता! राजकीय प्रतिष्ठा पणाला; पक्षीय ताकद, बंडखोरी आणि मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

Tuesday, 27 October 2026, 10:09

मोबाइल नंबर हवा, Instagram-Snapchat आयडीही मागितला; इंदापुरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्…

Tuesday, 27 October 2026, 10:02

पुण्यातील ‘लेडी डॉन’वर MPDA अंतर्गत कारवाई; वारंवार कारवाईनंतरही अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 9:53

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Tuesday, 27 October 2026, 9:45

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55
Next Post

टँकरचे चाक डोक्यावरुन गेल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू; पिंपळे सौदागर येथील घटना, चालक फरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp