Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : “कैसा हराया…” सहर शेख यांच्या वक्तव्यांवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रीया… म्हणाले, एखादी लहान मुलगी….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 January 2026, 19:31
Politics

photo- social media

Politics : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असतानाच, ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यात एमआयएमने जिंकलेल्या पाच जागांनी राजकीय चर्चेला वेगळी दिशा दिली. विशेषतः एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांच्या विजयानंतर केलेल्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला. “कैसा हराया…” असा थेट उल्लेख करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली टिप्पणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली. मुंब्र्यात आयोजित त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी “कोण आया, शेर का शिकारी आया” अशा घोषणा दिल्या जात होत्या. या घोषणांबाबत विचारले असता आव्हाड म्हणाले, “आजकाल अशा घोषणा प्रत्येक गल्लीबोळात ऐकायला मिळतात. ही नवीन पोरं कल्पकपणे घोषणा देतात. त्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही.”

सहर शेख यांच्या वक्तव्यावर बोलताना आव्हाड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “एखादी लहान मुलगी मिश्किलपणे काहीतरी बोलते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल होतं. त्यात फार अर्थ काढण्याची गरज नाही. ते बालिशपण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. “माझी लहान मुलगी ‘चॉकलेट लाया’ असं म्हटलं तरी ते व्हायरल होईल, यात काही विशेष नाही,” असे म्हणत त्यांनी हा वाद फुगवण्यास नकार दिला.

 

एमआयएमच्या विजयावर प्रतिक्रिया देताना “हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोके हजार” अशा शब्दांत आव्हाड यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष उत्तर दिले. मात्र त्यांनी चर्चेचा केंद्रबिंदू स्पष्टपणे बदलत एक महत्त्वाचा राजकीय संदेश दिला. “मुंब्रा तिरंगा आहे. हा देश तिरंगा आहे, महाराष्ट्र तिरंगा आहे. संविधानाने या देशाला तिरंगा दिला आहे. कोणत्याही एका रंगाची मक्तेदारी इथे चालणार नाही,” असे आव्हाड ठामपणे म्हणाले.

या विधानातून मुंब्र्यातील राजकारण केवळ निवडणूक निकालापुरते मर्यादित नसून, ओळख, संविधान आणि लोकशाही मूल्यांभोवती फिरत असल्याचे स्पष्ट होते. (Politics)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post
Pune Crime: Rage over parking in Pune! Stabbed with knives, beaten with sticks; Two families from the same settlement clashed

Pune Crime: पुण्यात पार्किंगवरून राडा! सुऱ्यांनी वार, लाकडांनी मारहाण; एकाच वस्तीतील दोन कुटुंबात जुंपली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.