मुंबई – मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात कोश्यारी आले होते. त्या कार्यक्रमात कोशारी म्हणाले कि, गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. ती राहणार नाही. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
याबाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले कि, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्य शासनानंही नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचे हे विधान राज्याचा अपमान करणार आहे. आणि त्याबाबत केंद्र सरकारकडे आम्ही तक्रार करणार आहे. तसेच राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकते. असेही केसरकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या विधानावरुन शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला जाब विचारला होता. त्यांना केसरकर यांनी उत्तर दिले आहे.
संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले कि, राज्यपालांच्या विधानाचा आम्ही शंभर टक्के निषेध करतो. याबाबत आम्ही केंद्र शासनाला कळवू की ज्यांची नियुक्ती राज्याचा घटनात्मक प्रमुख केलेली असते. त्यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजेत. त्यामुळं मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन परत येतील. तेव्हा आम्ही सर्व आमदार त्यांना भेटून चर्चा करु. मुख्यमंत्री याची निश्चितच दखल घेतील.
याबाबत बोलताना मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले कि, राज्यपालांना आम्ही पहिल्यांदा वॉर्निंग देतोय की, त्यांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. इथे राज्यपाल म्हणून आला आहात. तर आम्ही तुमचा आदर करतो. त्यांच्या पदाचा आदर करतो. गुण्यागोविंदानं त्यांनी महाराष्ट्रात रहावं. नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये. असा सल्ला दिला आहे.