Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar News : तिरंगा ध्वज स्तंभ उभारून योगेशबापू ससाणे यांनी राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम केलं : अजित पवार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 28 August 2023, 18:58

हडपसर, ता.२८ : हडपसरच्या जनतेच्या हितासाठी, नागरी प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नगरसेवक योगेशबापू ससाणे यांनी १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभ स्वखर्चाने उभारून नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ससाणेनगर येथे सांगितले.

नगरसेवक योगेशबापू ससाणे यांनी स्वखर्चातून ससाणेनगरमध्ये उभारलेला १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा आज आयोजित केला होता. यावेळी अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत, कार्यकारी चेअरमन विकास रासकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी सभापती सचिन घुले, संदीप तुपे, आरपीआय नेत्या शशिकला वाघमारे, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख डॉ. शंतनू जगदाळे, माजी नगरसेवक सोपान गोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ससाणेनगरमध्ये ढोलताशांच्या गजरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण केल्यानंतर नगरसेवक योगेशबापू ससाणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व.डॉ समीर बोराटे पथ नामफलकाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी बोराटे परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनतर १०६ फूट उंच ध्वज स्तंभाचे उद्घाटन झाले. राष्ट्रगीत, परेड, सलामी न्यू इंग्लिश स्कुलच्या तसेच वर्धमान इग्लिश स्कुल व माळीण बाई प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी दिली. यावेळी सर्वानी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’चा जयघोष केला. फुले पगडी, उपरणे, राधा कृष्ण प्रतिमा, भगवदगीता देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल योगेशबापू आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आर्यनमॅन डॉ. शंतनू जगदाळे, सायकलपटू चंद्रकांत हरपले यांच्यासह मनपा अतिरिकत आयुक्त विकास ढाकणे व मनपा उपायुक्त संदीप कदम तसेच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआयपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच रनर राजेश पाटील, किरण घुले, राजु पोतदार आदींचा सन्मान यावेळी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक योगेश ससाणे यांनी वाहतूक कोंडी, सोलापुर रोडला पर्यायी रस्ते, ससाणे नगर रेल्वे भुयारी मार्ग, पाणी टंचाई, हडपसर भाजी मंडईचे विस्तारीकरण, बेबी कॅनॉलवरुन रोड अथवा मेट्रो प्रकल्प, हडपसर विधानसभा मतदारसंघांतील सुमारे ६ ठिकाणचे विविध अंडरपास, रामटेकडी कचरा प्रकल्प या गंभीर प्रश्नाकडे अजित पवार यांचे लक्ष वेधत विविध उपाययोजना राबवण्याची मागणी यावेळी केली.

विशेष बाब म्हणजे जवळपास सुमारे ३० माजी नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक यांना बोलावून योगेश ससाणे यांनी या सर्वांची नावे कोनशिलेवर टाकुन सन्मानित केले. तसेच आगामी मोठ्या निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्याचे फोटो लावून दोन्ही गटांना समांतर ठेवण्याची कला साधल्याची खमंग चर्चा कार्यक्रमस्थळी दिसून आली. यावेळी आभार माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेशबापू ससाणे मित्रपरिवार आणि सावली फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

धानोरेतून विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.