Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

क्रूरतेचा कळस! शाळेतील 11 मुलांना विषबाधा; मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी रचला कट, 3 आरोपींना ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 4 August 2025, 8:39

बेळगाव: मुख्याध्यापकाची बदली व्हावी या एका विकृत विचारातून शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याची धक्कादायक घटना बेळगावातील सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शाळेतील 11 मुलांना विषबाधा झाली होती, मात्र सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व मुले सुरक्षित आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कटात सागर सक्रेप्पा पाटील (29), नागनगौडा बसप्पा पाटील (25) आणि कृष्णा यमनप्पा मादर (26) या तिघांचा सहभाग आहे.

नेमकं काय घडलं?

हुलीकट्टी येथील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील 11 विद्यार्थ्यांना साधारण पंधरा दिवसांपूर्वी अचानक पोटात दुखणे, उलट्या होणे आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकूण 41 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील मुलांची अवस्था पाहून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक धक्कादायक सत्य समोर आले.

शाळेतील मुख्याध्यापक सुलेमान घोरी नायक यांची बदली व्हावी म्हणून सागर पाटील नावाच्या व्यक्तीने हा भयानक कट रचला. गेल्या 14 वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेल्या या मुख्याध्यापकांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा विकृत विचार त्याने केला. जर विद्यार्थी विषबाधेमुळे मृत झाले तर त्याचा ठपका मुख्याध्यापकांवर येईल आणि त्यांची बदली करणे सोपे होईल, यामुळे आरोपीने अनेक निष्पाप बालकांचा जीव धोक्यात घातला आहे.

असा रचला कट

या कटात आरोपी सागर पाटीलने नागनगौडा आणि कृष्णाला सामील केले. या दोघांनी कीटकनाशक आणले. त्यानंतर, शाळेतीलच एका मुलाला चॉकलेट आणि 500 रुपयांचे आमिष दाखवून त्याला ते कीटकनाशक शाळेच्या पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितले. त्या मुलानेही त्यांच्या सांगण्यानुसार विष पाण्याच्या टाकीत टाकले. या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

पुणे पोलिसांच्या भूमिकेमुळे वाद पेटला; 3 मुलींच्या छळ प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास दिला ठाम नकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.