Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 5 December 2023, 16:26
Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi shot dead in Jaipur home

जयपूर: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुखदेव सिंग गोगामेडी यांची श्यामनगर भागातील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुखदेव सिंग यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या कुठे लागल्या याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यांच्या श्याम नगर येथील राहत्या घरी गोळी झाडण्यात आली. यानंतर मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सुखदेव सिंग यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गोळ्या कोणी झाडल्या, याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

सुखदेव सिंह गोगामेडी हे राष्ट्रीय करणी सेनेशी दीर्घकाळापासून जोडले गेले आहेत. करणी सेना संघटनेत बराच काळ वाद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. गोगामेडी त्याचे अध्यक्ष आहेत. पद्मावत चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर राजस्थानमध्ये झालेल्या निदर्शनांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या मुद्द्यांशी संबंधित त्यांचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

 

जयपूरमध्ये पोलीस प्रशासन हाय अलर्टवर

ही बातमी संपूर्ण राज्यात वणव्यासारखी पसरली. परिस्थिती पाहून संपूर्ण जयपूर शहरात पोलीस हाय अलर्ट मोडवर आले. त्याचबरोबर राज्यातील इतर भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होते आणि ते कुठून आले याबाबत अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. आरोपींच्या शोधात पोलिसांची धावपळ सुरू आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गोगामेडी हे बऱ्याच दिवसांपासून सुरक्षेची मागणी करत होते.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
Fake factory on the name jindal steel in dhule

जिंदाल स्टिलच्या नावाने धुळ्यात बनावट कारखाना, मालक ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.