Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जमीन घेताय? थांबा! ‘हा’ एक शब्द तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो; व्यवहार करण्यापूर्वी ‘हे’ नक्की तपासा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 8 February 2026, 12:50

पुणे: स्वतःच्या हक्काची जमीन (Property News) असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकदा लोक जमिनीचा लोकेशन, मातीचा पोत आणि बाजारभाव पाहून व्यवहार पक्का करतात. पण, कायद्याच्या भाषेत जमिनीचा व्यवहार हा केवळ जागेचा नसून ‘कागदपत्रांचा’ असतो. सातबारा उताऱ्यावर दिसणाऱ्या ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ या दोन शब्दांकडे दुर्लक्ष करणं भविष्यात तुम्हाला न्यायालयात खेचू शकतं किंवा तुमचे लाखो रुपये बुडवू शकतं.

 

सातबारा हा केवळ जमिनीची मालकी कोणाची आहे हे सांगणारा कागद नाही, तर तो जमिनीचा कायदेशीर इतिहास असतो. जमीन नेमकी कोणाची आहे? ती कशी मिळाली? ती विकण्याचा अधिकार सध्याच्या मालकाला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ या रकान्यात दडलेली असतात.

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ नुसार जमिनीचे तीन मुख्य प्रकार आहेत, जे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे:

१. स्वतःची जमीन (भोगवटादार वर्ग १): साध्या भाषेत सांगायचं तर, ही जमीन म्हणजे मालकाचीच असते. सातबाऱ्यावर ‘वर्ग १’ किंवा ‘जुनी शर्त’ असा उल्लेख असेल, तर समजा तुम्ही सुरक्षित आहात. या जमिनीवर कोणाचंही बंधन नसतं. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा, कोणालाही ही जमीन विकता येते. यासाठी तुम्हाला परवानगी घेण्याची गरज नसते. गुंतवणुकीसाठी हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो.

२. ‘भागीदारी’ जमीन (भोगवटादार वर्ग २): ही जमीन जरी खाजगी असली, तरी यात ‘सरकार’ अदृश्य भागीदार असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा नंतर सरकारने विशिष्ट कारणांसाठी (उदा. सैनिकांचे पुनर्वसन, वतनदार किंवा भूमिहीन) या जमिनी दिलेल्या असतात. सातबाऱ्यावर ‘नवीन शर्त’ किंवा ‘वर्ग २’ दिसलं की सावध व्हा! ही जमीन विकताना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘होकार’ आणि विशिष्ट रक्कम भरणं अनिवार्य आहे. जर मालकाने परस्पर व्यवहार केला, तर पैसे देऊनही भविष्यात अडचणी येऊ शकतात.

३. ‘भाड्याची जमीन’ (शासकीय पट्टेदार): या जमिनीवर तुमची मालकी कधीच नसते. सरकार विशिष्ट कालावधीसाठी (उदा. ३०, ६० किंवा ९९ वर्ष) ही जमीन एखाद्याला वापरण्यासाठी देतं. हे एखाद्या भाड्याच्या घरासारखं आहे. मुदत संपली की जमीन पुन्हा सरकारची! अशा जमिनींच्या व्यवहारात पडणं म्हणजे अवघड असता कारण इथं हस्तांतरणाचे नियम अत्यंत कडक असतात.

जर तुम्ही ‘वर्ग २’ ची जमीन सरकारी परवानगीशिवाय घेतली, तर भविष्यात सरकार ती जमीन जप्त करू शकतं. अनेकदा बिल्डर किंवा मध्यस्थ लोक या तांत्रिक बाबी लपवतात. सातबाऱ्यावर ‘भोगवटादार वर्ग २’ किंवा ‘नवीन शर्त’ असा उल्लेख असल्यास, जोपर्यंत सरकारची फी भरली जात नाही, तोपर्यंत ती जमीन तुमची होऊ शकत नाही. त्यामुळे व्यवहार करतांना या गोष्टी तपासा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पुण्यात तरुणाचा जागीच कोळसा; धडकी भरवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.