पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी मॉरीशस (Mauritius) येथे आईच्या नावाने एक झाड लावले आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमे अंतर्गत मोदींनी मॉरिशस येथे हे झाड लावले आहे. पंतप्रधान मोदींनी 5 जून 2024 रोजी दिल्लीच्या बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावून ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेची सुरुवात केली होती. पंतप्रधानांनी या मोहिमे अंतर्गत सीवूसागर रामगुलाम बोटॅनिकल गार्डनमध्ये झाड लावले आहे. यापूर्वीही त्यांनी गयाना दौऱ्यात असाच पुढाकार घेत आईच्या नावावर एक झाड लावले होते. पीएम मोदी सध्या दोन दिवसाच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. वृक्षारोपनाची गरज लक्षात घेतला मोदींनी हा उपक्रम सुरु केला आहे.

दरम्यान, मोदींनी केलेल्या या जनजागृतीमुळे भारतात आत्ता पर्यंत 1 अब्जाहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 136 देशांमध्ये 27,500 हून अधिक झाडे लावण्यात आली आहे. मोदींनी अनेक दौऱ्या दरम्यान या मोहिमे अंतर्गत वृक्षरोपण केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, मोदींनी हाती घेतलेल्या या मोहिमेचा प्रभाव सध्या भारता बाहेरही पाहायला मिळत आहे. अनेक लोक मोदींच्या पावलावर पाव ठेवत आईच्या नावाने वृक्ष लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांनी या मोहिमे अंतर्गत वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाच्या अनेक समस्या सुटील हे खरे आहे.








