उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एका अनोख्या कौटुंबिक प्रकरणाची चर्चा सुरू आहे. पाच मुलांची आई आणि तिच्या 20 वर्षीय जावयामधील कथित प्रेमसंबंधामुळे कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. दोघेही एकमेकांसोबत राहण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे महिलेच्या मुलांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी या नात्याला विरोध केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सुमारे 35 वर्षांची असून तिच्या पतीचे काही काळापूर्वी निधन झाले आहे. पतीच्या मृत्यूनंतर ती आपल्या पाच मुलांसोबत राहत होती. याच काळात तिची आणि जावयाची जवळीक वाढल्याचे सांगितले जात आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून दोघांमधील संबंध अधिक वाढल्याची माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांमध्ये वाद झाला. महिला आणि तिचा जावई एका नातेवाईकाच्या घरी गेले असताना तिच्या मुलांना या नात्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही आपल्या निर्णयावर कायम राहिल्याने अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या नात्याबाबत चौकशी केली. यावेळी तरुणाने महिलेसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. महिलेनेही त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. महिलेच्या मुलांची जबाबदारी घेण्याबाबतही तरुणाला पोलिसांनी प्रश्न विचारले.
त्याच्या पत्नीबद्दल विचारले असता तरुणाचे म्हणणे आहे की, तिला त्यांच्यासोबत राहायचे असेल तर ती राहू शकते, मात्र तसे नसेल तर ती स्वतंत्रपणे राहू शकते. पोलिसांनी महिलेच्या मुलांबाबत विचारणा केली असता तरुणाने सांगितले की तिला पाच मुले आहेत. महिलेच्या मुलांची जबाबदारी घेण्याबाबतही तरुणाला पोलिसांनी प्रश्न विचारले. त्यावर तरुणाने सांगितले की, महिलेची जी मुले त्याच्यासोबत राहण्यास तयार असतील, त्यांना तो आपल्यासोबत ठेवण्यास तयार आहे. तसेच लहान मुलांची देखभाल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्याचीही त्याने तयारी दर्शवली आहे.
सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यांना समजावून घरी पाठवल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात लेखी तक्रार मिळाल्यास नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.






