मुजफ्फराबाद: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पुलवामा 14 फेब्रुवारी2019 रोजी येथे जवानांच्या ताफ्यावर एक भीषण आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 पेक्षा जास्त वीर जवान शहीद झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले गेले होते. या काळ्या कारस्थानामागे ज्या प्रमुख सूत्रधारांचा हात होता, त्यापैकी एक नाव म्हणजे दहशतवादी हमजा बुरहान हा होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हमजा बुरहान मुजफ्फराबादमधील आपल्या कार्यालयात बसलेला असताना, काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी तिथे घुसून त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात हमजा बुरहान जागेवरच ठार झाला आहे.
भारतासाठी ही अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी असून, यामुळे सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादी नेटवर्कला खूप मोठा धक्का बसला आहे.







