तिरुअनंतपुरम : गेल्या काही दिवसांपासून गाजलेले हनीट्रॅप प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेय. आयटी कंपनीच्या मालकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार केरळातील एर्नाकुलममध्ये घडला असून, व्यवसाय सुरु करण्यासाठी एका जोडप्याने हा कांड केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने आता परिसरात एकच खळबळ उडालीये.

नेमकं प्रकरण काय?
श्वेता बाबू आणि कृष्णा राज असं या जोडप्याचे नाव आहे. दोघांनी मिळून आयटी कंपनीच्या मालकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून 30 कोटींची मागणी केली. नवरा बायको मिळून अनेक दिवसांपासून याचे प्लॅनिंग करत होते. अशी माहिती देखील समोर आली आहे.
या प्रकरणासंबंधित पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ‘श्वेता बाबू ही तक्रारदाराच्या आयटी कंपनीत केल्या काही महिन्यांपासून काम करत होती. याच काळात तिने पती कृष्णा राजसोबत मिळून हनीट्रॅपचा प्लॅन आखला. आणि मालकालाचं अडकवायचं ठरवलं.
एक दिवस श्वेताच्या नवऱ्याने तिच्या कंपनीच्या मालकाला मेसेज केला की, तुझे श्वेतासोबत अनैतिक संबंध आहेत. तुमचे खाजगी चॅट्स सार्वजनिक करुन प्रतिमा मलीन करु, तुझ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करु, आणि जर हे नको असेल तर आम्हाला पैसे द्या. अशी धमकी श्वेताच्या नवऱ्याने दिली.
दरम्यान, या जोडप्याने 23 जुलै रोजी संबंधित आयटी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना एर्नाकुलममधील एका हॉटेलमध्ये बोलावून 30 कोटी रुपयांची मागणी केली. कृष्णा राजच्या बँक खात्यात 10 कोटी रुपये त्वरित जमा करण्यास सांगितलं. उर्वरित 20 कोटींसाठी दोन चेकची मागणी केली. त्यांनी आयटी कंपनीच्या मालकाला 50 हजार रुपये देण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपयांचे दोन चेक घेतले. घडलेल्या प्रकारानंतर आयटी कंपनीच्या मालकाने पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले आणि पोलिसात धाव घेतली.
तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या व त्यांची चौकशी केली असता. धक्कादायक कारण समोर आले. बंद पडलेले हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी हे सगळं केलं असल्याचे जोडप्याने कबूल केले. त्यानंतर जोडप्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.







