पुणे: भारतात 1 डिसेंबर रोजी सोन्याचे (Gold Rate Today) दर जवळपास स्थिर आहेत. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,29,810 रुपये नोंदवला गेला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर, जो प्रामुख्याने दागिने बनवण्यासाठी वापरला जातो, तो 1,18,990 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 30 नोव्हेंबरच्या दरांशी तुलना केल्यास, आज सोन्याच्या किंमतीत फारसा मोठा बदल झालेला नाही, पण 29 नोव्हेंबरच्या तुलनेत दरात वाढ झाली आहे.

सोन्यासोबतच, चांदीच्यादरात आज 1 डिसेंबर रोजी किरकोळ घट झाली आहे. चांदीचा आजचा भाव प्रति किलोग्रॅमसाठी1,84,900 रुपये इतका आहे, तर प्रति ग्रॅमचा दर 184.90 रुपये आहे. मागील दरांच्या तुलनेत आज 100 रुपयांनी घट झाली आहे.
केरळ, कोलकाता, हैद्राबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,29,810 रुपये आहे. 1 डिसेंबर रोजी सोन्याचे दर 30 नोव्हेंबरच्या तुलनेत स्थिर दिसत असले तरी, मागील आठवड्याच्या तुलनेत ते उंचावलेले आहेत.







