Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CM Delhi : कोण आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता? वाचा सविस्तर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 19 February 2025, 21:52

दिल्ली : अखेर दिल्लीकरांना नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपने याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यासाठी भाजपने ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखर यांची नियुक्ती केली होती. रेखा गुप्ता शालिमार बाग मतदारसंघाच्या आमदार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनेतने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपने दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर विजय प्राप्त केला आहे. विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत, तर आम आदमी पक्षाने 22 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला मात्र तिसऱ्यांदा भोपळा फोडण्यात अपयश आले आहे.

कोण आहेत रेखा गुप्ता?

रेखा गुप्ता पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्या शालिमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला आहे.

आरएसएसच्या सक्रिय सदस्य..

रेखा गुप्ता या बालपणीपासू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय सदस्य आहेत. संघाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मधून त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला आहे. 1994-95 मध्ये, दौलत राम कॉलेजमध्ये त्यांची सचिव म्हणून निवड झाली. 1995-96 मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या सचिव म्हणून निवड झाली. 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या त्या अध्यक्षही राहिल्या आहेत.

भाजपमध्ये भूषवली अनेक पदे

रेखा गुप्ता यांनी 2003-2004 दरम्यान भाजप युवा मोर्चाचे दिल्लीत सचिवपद भूषवले आहे. तसेच त्या 2004-2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. एप्रिल 2007 मध्ये त्या उत्तर पितामपुरा प्रभागातून भाजपच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. महापालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांना २००७-२००९ या काळात महिला कल्याण व बालविकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. मार्च 2010 मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आले. सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. रेखा गुप्ता या शालिमार बाग वॉर्डातून नगरसेवकही राहिल्या आहेत.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत पराभव

रेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. 2015 मध्ये त्यांचा वंदना कुमारी यांच्याकडून सुमारे 11 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2020 मध्ये त्यांचा पराभव 3 हजार 440 मतांनी झाला होता. मात्र यावेळी रेखा गुप्ता यांनी निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

रेखा गुप्ता हरियाणातील जिंद येथील रहिवासी

रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातील जिंद येथील असून त्यांचे वडिलोपार्जित गाव नंदगढ हे जिंदमधील जुलाना भागात आहे. येथे त्यांचे आजोबा मणिराम आणि बाकीचे कुटुंब राहत होते. रेखाचे वडील जय भगवान यांना दिल्लीत नोकरी लागली, त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला राहायला आले. रेखा गुप्ता यांचे पदवीपर्यंतचे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले असून रेखा गुप्ता यांचा १९९८ मध्ये मनीष गुप्ता यांच्यासोबत विवाह झाला होता. मनीष गुप्ता यांचा स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय आहे.

Rekha Gupta

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14

कॅम्प परिसरात बेवारस बॅग, बॉम्ब असल्याचा संशय अन् पोलिसांची घटनास्थळी धाव; बॉम्बशोधक पथकानं परिसर खाली केला अन् झडती घेताच…

Friday, 27 November 2026, 14:45

पुण्यात महिलेच्या संशयास्पद हालचाली! हातात बॅग घेऊन परिसरात वावर; टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली….

Friday, 27 November 2026, 14:28

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणारा मुख्य आरोपी अल्पवयीन; आता बाल न्याय मंडळासमोर होणार सुनावणी

Friday, 27 November 2026, 14:24
Next Post

महानुभाव पंथांच्या मठात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp