Bihar Election Result 2025 Live: आज सकाळी ८ वाजल्यापासून बिहार विधानसभेची मतमोजनीस सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे ट्रेंड समोर येत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीलाच निवडणूक निकालांमध्ये एनडीए लक्षणीय आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bihar Election Result 2025)

पोस्टल मतपत्रिकांमध्ये बाजी कोणाची? (Bihar Election Result 2025)
सध्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी होत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुकसार एनडीएने 64 विधानसभांच्या जागांवर आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. तर महाआघाडी 38 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. आलेले आकडे आणि हा ट्रेंड दिवसभर असाच सुरू राहिला तर एनडीएच्या दिशेने सत्ता समीकरणं अधिक झुकतील असे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले प्रशांत किशोर यांचा जन सूराज्य सध्या 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे







