बिहार: गेल्या निवडणुकीत (Bijar Election 2025) एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त 20 हजार मतांनी (Tejaswi Yadav) आघाडी मिळाली होती, त्यामुळे हा फरक (Tejpratap Yadav) यंदाही महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या 189 जागांचे कल आले असून 122 हा बहुमताचा आकडा आहे. एनडीए 105 जागांवर दिसत आहे, तर महागठबंधन 78 जागांवर आहे. स्वतंत्र पक्षांकडे पाहिल्यास आरजेडी सर्वात वेगाने पुढे जात आहे; भाजप 53 तर आरजेडी 69 जागांवर दिसत आहे, आणि ताज्या आकड्यानुसार आरजेडी 71 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस केवळ 8 जागांवर पुढे आहे आणि 1995 पासून काँग्रेस कधीही 30 जागांपलीकडे गेलेली नाही. त्यामुळे खरी लढत नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात दिसते. अनेक निवडणुकांमध्ये समीकरणे बदलली तरी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले असून यावेळीही निकाल कोणाच्या बाजूने झुकतात त्यावर नितीश कुमार कोणासोबत जाणार हे ठरणार आहे.








