Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदाराच्या घरात छापा; सोन्याचा खजिना पाहून EDच्या अधिकाऱ्यांना आली भोवळ; देशभरात कारवाईने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 22:20
Bengluru News: Raid on MLA's house; ED officials were stunned after seeing the gold treasure; The action created a stir across the country

Photo-Social Media

बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये (Bengluru News) अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत तब्बल 50.33 कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, चाल्लेकरे येथील दोन लॉकरमधून 24 कॅरेटचे जवळपास 40 किलो सोन्याचे बिस्किटे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई एका आमदार आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्डरिंग आणि अवैध ऑनलाइन सट्टेबाजीच्या तपासाचा एक भाग आहे. या आमदाराने आपल्या नातेवाईक आणि सहयोगींच्या मदतीने विविध बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी संकेतस्थळे चालवली होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक केली गेली. खेळाडूंनी जमा केलेला पैसा विविध पेमेंट गेटवेद्वारे गोळा करण्यात येत असे. त्यानंतर तो पैसा वेगवेगळ्या नावाने उघडलेल्या बोगस खात्यांमधून फिरवण्यात येत असे, ज्यामुळे पैशांचा मूळ स्त्रोत लपवला जाई.

तपासात हेही स्पष्ट झाले आहे की या बेकायदेशीर संकेतस्थळांद्वारे देशभरात सायबर गुन्ह्यांचे जाळे निर्माण झाले होते. छोट्या मोबदल्यासाठी व्यक्तींच्या नावाने खाती उघडली जात होती आणि त्यांचा वापर गुन्हेगारी पैशांच्या हालचालींसाठी केला जात होता. या सट्टेबाजी नेटवर्कचा एकूण उलाढाल 2000 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.

 

या पैशांचा वापर परदेशी प्रवास, व्हिसा, आलिशान हॉटेलांमध्ये खर्च तसेच मार्केटिंग, बल्क एसएमएस, वेबसाइट होस्टिंग आणि सर्च इंजिन सेवांसाठी करण्यात आला. या सर्व सेवांसाठी लागणारा पैसा बोगस खात्यांमधून वळवण्यात आल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीही या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर सोनं, चांदी, रोख रक्कम आणि परदेशी चलन जप्त केले होते. आता नव्याने जप्त करण्यात आलेल्या 40 किलो सोन्यामुळे या तपासाला अधिक गती मिळाली आहे. अधिकाऱ्यांकडून या प्रकरणातील मोबाईल डेटा, बँक व्यवहार आणि इतर पुराव्यांची सखोल चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आज दिवे घाटातून जाणार असाल तर थांबा! 2 तास वाहतूक बंद, ‘हा’ मार्ग वापरा

Tuesday, 28 July 2026, 9:44

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36
Next Post
Nagpur Crime: 'I have been following you for three years, you should secretly chat with children,' young man's outrageous act in a moving bus due to one-sided love

'मी तीन वर्षांपासून तुझ्या मागे फिरतोय, तुला मुलांसोबत लपून-लपून चॅटिंग करायला पाहिजे,' एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धावत्या बसमध्ये संतापजनक कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.