अलीगड: ‘सासू-जावई’ हे नातं (Aligarh News) अत्यंत पवित्र आणि आदराचं मानलं जातं. पण उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये घडलेल्या एका घटनेनं सामाजिक नैतिकतेच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवल्या आहेत. समाजाची पर्वा न करता सासू जावयासोबत पळून गेली होती, आता त्याच जावयाला लाखोंचा चुना लावून ही महिला तिसऱ्याच व्यक्तीसोबत पसार झाली आहे.

एप्रिल 2025 मध्ये लग्नाच्या अवघ्या 9 दिवस आधी, 6 एप्रिल रोजी होणारा जावई राहुल हा स्वतःच्या होणाऱ्या सासूला (सपना) घेऊन पसार झाला होता.
कुटुंबीयांचा विरोध, पोलिसांचं समुपदेशन सगळं धुडकावून सपना जावयासोबत बिहारमधील सीतामढी येथे राहू लागली. गेल्या 10 महिन्यांपासून हे दोघ पती-पत्नी म्हणून संसार करत होते. राहुलला वाटलं की, आता सगळ चांगलं होत आहे. पण स्वप्नातही त्याला वाटलं नसेल की, ज्या स्त्रीने स्वतःच्या मुलीला धोका दिला, ती त्यालाही धोका देऊ शकते.
सगळ काही नीट सुरु असतांना 6 फेब्रुवारी रोजी सपना राहुलला सोडून तिच्या ‘मेहुण्यासोबत’ पळून गेली. राहुलचा आरोप आहे की, जाताना सुमारे 2 लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला आहे.







